कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली. गेल्या 24 तासांत 299 नवे रुग्ण तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 181 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2521वर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 2 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकूण अॅक्टिव्ह 2 हजार 521 रुग्णांपैकी ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रात 911 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत, तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 505 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 2वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 653 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021ला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 521 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 828 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील | 65 रुग्ण |
1 ते 10 वर्ष | 2021 रुग्ण |
11 ते 20 वर्ष | 3836 रुग्ण |
21 ते 50 वर्ष | 29367 रुग्ण |
51 ते 70 वर्ष | 15721 रुग्ण |
71 वर्षांवरील | 3992 रुग्ण |
जिल्ह्यात असे एकूण | 55 हजार 2 रुग्ण |
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा | 972 |
भुदरगड | 1333 |
चंदगड | 1260 |
गडहिंग्लज | 1655 |
गगनबावडा | 161 |
हातकणंगले | 5598 |
कागल | 1755 |
करवीर | 6168 |
पन्हाळा | 1977 |
राधानगरी | 1314 |
शाहूवाडी | 1418 |
शिरोळ | 2616 |
नगरपालिका कार्यक्षेत्र | 8131 |
कोल्हापूर महानगरपालिका | 17772 |
इतर जिल्ह्यातील, राज्यातील | 2872 |