ETV Bharat / city

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्ण वाढीचे रेकॉर्ड ब्रेक; ६६१ नव्या रुग्णांची नोंद - Kalyan dombivali corona update

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १२ हजार ८१३ रुग्ण संख्येपैकी ६ हजार ३५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६ हजार २६९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Kalyan Dombivali corona update
कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 13, 2020, 7:23 AM IST

कल्याण डोंबिवली(ठाणे)- शहरात रविवारी नव्याने ६६१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या १२ हजार ८१३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ८ रुग्णांचा मुत्यू झाला आहे.

रविवारी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. शहरात कोरोनामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्येपैकी ६ हजार ३५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६ हजार २६९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

लॉकडाऊनमध्येही नागरिकांकडून पालिका प्रशासनाला पाहिजे तसे सहकार्य मिळाले नसल्याने कोरोनाचा संसर्ग इतक्या झपाट्याने वाढत गेलाय. गेल्या दहा दिवसांमध्ये दरदिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून आले आहे. सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णायलही रुग्णांनी हाऊसफुल झाले आहेत.

रविवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्व १९०, कल्याण पश्चिम १७२, कल्याण पूर्वेत १२९, डोंबिवली पश्चिमेत १०८, टिटवाळा - मांडा १४ , मोहने ३७ आणि पिसवलीमध्ये १ अशा एकूण ६६१ रुग्णांची विक्रमी नोंद झाल्याने शहरातील परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून आले.

महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन घोषित करूनही गल्ली बोळातील फेरीवाले व भाजीपाला विक्रेते बिनधास्तपणे रस्त्यावर व्यवसाय थाटून बसल्याचे दिसून येत आहे. यामुळे चाळ , झोपडपट्टीत परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याचे जागृत करदात्या नागरिकांचे म्हणणे असून त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाचा १०० टक्के लॉकडाऊनचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.