ETV Bharat / city

सापांचा मानवी वस्तीत शिरकाव ; सर्पमित्राकडून पाच सापांना जीवदान

author img

By

Published : Dec 26, 2020, 3:45 PM IST

मागील आठ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने उब शोधत असलेल्या सापांनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरात मानवी वस्तीतून चार तर कल्याणच्या रेल्वे लोकोशेडमधून एक असे पाच साप सर्पमित्रांने पकडले आहेत. यानंतर त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून जीवदान देण्यात आले.

wild life activist in kalyan
सापांचा मानवी वस्तीत शिरकाव ; सर्पमित्राकडून पाच सापांना जीवदान

ठाणे - मागील आठ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने उब शोधत असलेल्या सापांनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरात मानवी वस्तीतून चार तर कल्याणच्या रेल्वे लोकोशेडमधून एक असे पाच साप सर्पमित्रांने पकडले आहेत. यानंतर त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून जीवदान देण्यात आले.

भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी

नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदलल्याने साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. खडकपाडा परिसरातील नीलकंठ पार्क सोसायटीतील एक रहिवासी दुचाकी काढण्यासाठी पार्किंगमध्ये गेल्यानंतर मोठा साप सोसायटीत शिरल्याची बातमी त्यांनी सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. सर्पमित्र दत्ता यांनी या सापाला पकडून पिशवीत टाकल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा साप धामण जातीचा असून बिनविषारी आहे.

विषारी घोणस साप रेल्वेच्या लोकोशेडमध्ये तर दुसरा पडवीत

दुसऱ्या घटनेत कोळीवली गावात एका घराच्या पडवीत विषारी साप शिरल्याची माहिती वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप पाच फूट लांबीचा असून अंत्यत विषारी घोणस जातीचा आहे. तिसऱ्या घटनेत कल्याण रेल्वे लोकोशेडमध्ये विषारी साप शिरल्याची माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप चार फूट लांबीचा असून अंत्यत विषारी अशा घोणस जातीचा आहे.

एक साप मातीच्या ढिगाऱ्याखाली तर दुसरा पुस्तकाच्या कपाटात

चौथ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर खोदकाम करताना मजुराला भलामोठा साप अर्धवट मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला दिसला. त्याने याची माहिती मालकाला दिली. त्यांनतर मालक भोईर यांनी सर्पमित्र वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या सापाला पकडले. हा साप असून ६ फूट लांबीचा असून धामण जातीचा आहे. पाचव्या घटनेत मैत्रीकुल आश्रमच्या एका पुस्तकाच्या कपाटात आश्रमातील विध्यार्थी पुस्तक घेण्यसाठी गेला असता त्याला भलामोठा साप कपाटात दडून बसल्याचे दिसला. त्याने या घटनेची माहिती आश्रमातील इतर विध्यार्थाना दिली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यांनतर घटनेची माहिती सर्पमित्र दत्ता यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कपाटात दडून बसलेल्या साडे सहा फुटाच्या सापाला बाहेर काढले . साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला हा साप धामण जाती आहे.

निर्सगाच्या सान्निध्यात सोडून जीवदान

या पाचही सापांना वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊन शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास निर्सगाच्या सान्निध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. मात्र हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे. कुठेही मानवीवस्तीत साप दिसल्यास वार संस्थेच्या सर्पमित्रांना याची माहिती देण्याचे अहवान करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.