ETV Bharat / city

'...म्हणून मोदी आणि अमित शहांचे आभार मानतो'

मागील पन्नास वर्ष दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी, समाजातील नागरिकांना एकत्र करण्यासाठी मी झटत आहे. त्यात मला अपेक्षित यश आले नाही. मात्र, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणून एका झटक्यात हे काम केले, असा टोला निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सरकारला लगावला.

निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील माध्यमांशी बोलताना

author img

By

Published : Jan 10, 2020, 10:57 AM IST

ठाणे - केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला. या कायद्यामुळे दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी समाज एकत्र येऊन लढा देत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे आभार मानतो, असा टोला निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सरकारला लगावला आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात संविधान बचाव समितीच्यावतीने कल्याणामधील शिवाजी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर कोळसे-पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील माध्यमांशी बोलताना

मागील पन्नास वर्ष दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी, समाजातील नागरिकांना एकत्र करण्यासाठी मी झटत आहे. त्यात मला अपेक्षित यश आले नाही. मात्र, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणून एका झटक्यात हे काम केले. या कायद्यामुळे ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही विरोधात आज दलित, मुस्लीम, ओबीसी एकत्र रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे माझ्या कामाला यश आले, असे बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले.

हेही वाचा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा केवळ मुस्लीम समाजावरच नाही तर सर्व जाती-धर्माच्या नागरिकांवर याचा परिणाम होणार आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला कुठलेही बंधन नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेने देशातील नागरिकांना मदत करावी असेही बी जी कोळसे-पाटील म्हणाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश मुथा, मुन्ना पांडे, शर्फउद्दीन करते, गिरीश लटके यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Intro:kit 319

Body:... म्हणून मोदी आणि अमित शहांचे आभार मानतो ,,, बीजे कोळसे - पाटील

ठाणे : केंद्र सरकारने एनआरसी , सीएए कायदा आणला, या कायद्यामुळे आज दलित, आदिवासी, मुस्लिम , ओबीसी समाज एकत्र येत एनआरसी , सीएए कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्याने मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहांचे आभार मानतो असे बोलत निवृत्त न्यायमूर्ती बीजे कोळसे - पाटील यांनी नागरिकत्व कायद्याचा विरोध केला,
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संविधान बचाव समिती, कल्याण, यांच्या वतीने कल्याणातील शिवाजी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेनंतर प्रसार माध्यमाची बोलताना त्यांनी सांगितले,

निवृत्त न्यायमूर्ती बीजे कोळसे पाटील म्हणाले की मी गेली पन्नास वर्ष विविध जातीतील दलित, आदिवासी, मुस्लिम , ओबीसी, समाजातील नागरिकांना एकत्र करण्यासाठी झटत आहे, मात्र पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्वाचा कायदा आणून मी गेली 50 वर्ष करीत असलेल्या कामाचं फलद्रूप झाले आहे, कारण या कायद्यामुळे ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही विरोधात आज दलित, मुस्लीम, ओबीसी, रस्त्यावर उतरले आहेत,
बीजे कोळसे -पाटील पुढे म्हणाले की, नागरिकत्व कायद्याचा केवळ मुस्लीम समाजालाच नव्हे तर सर्व जातीच्या नागरिकांवर याचा परिणाम होणार आहे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला कुठलाही कायदा लागत नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील नागरिकांना मदत करावी असेही ते म्हणाले,

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्ता सेटलवाड, कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश मुथा, मुन्ना पांडे, शर्फउद्दीन करते, गिरीश लटके, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते,

Conclusion:कल्याण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.