ETV Bharat / city

अनैतिक संबंधांच्या संशयातून 'सनम'चा खून; मारेकरी पतीची धक्कादायक कबुली - कल्याण

सनम दुचाकीवर बसून कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरात आली. त्यानंतर ती अॅक्टिव्हा दुचाकीवर थांबलेली असताना सचिन त्याच्या मित्रासह दुचाकीने तिथे आला. त्याने सनमवर धारदार चाकूने वार केले. हे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले होते.

पोलिसांसह अटकेतील मारेकरी
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:02 PM IST

Updated : Jul 6, 2019, 11:55 PM IST

ठाणे - सनम करोतीया या विवाहितेचा शुक्रवारी कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणी सनमचा पती बाबू ढकणी उर्फ सचिन करोतीयासह दीपक ठाकूर या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. सनमचे परपुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन हा खून केल्याची कबुली सचिनने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सनमचा कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी सायंकाळी दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या खुनाचा थरार सीसीटीव्हीत कैदही झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दोघांपैकी एक मारेकरी बाबू ढकणीला तासाभरात अटक केली. त्याचा दुसरा साथीदार दीपक ठाकूरला शनिवारी बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून या हत्येमागील कारण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मृत सनमचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सचिनला होता. त्याचा राग मनात धरुन तिचा नवरा बाबु उर्फ सचिन करोतीयाने तिची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. आज या दोन्ही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, दोघांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:सनम ची हत्या अनैतिक संबंधातून नवऱ्याने केल्याचे उघड; मारेकऱ्यांचे धक्कादायक कबुली

ठाणे :- कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या शुक्रवारी सनम करोतीया या 30 वर्षीय विहाहित महिलेची निर्घुण हत्या करण्यात आली होती, खळबळजनक बाब म्हणजे तिच्या नवऱ्याने हत्या केल्याचे उघड झाले आहे, दोन्ही मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,
बाबू ढकणी उर्फ सचिन करोतीया आणि दीपक ठाकूर असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या मारेकऱ्यांची आहेत, तर यातील बाबू उर्फ सचिन हा सनमचा नवरा असून त्याने बायकोचे एका परपुरुषाची अनैतिक संबंध असल्याचे हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे,
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात काल सायंकाळी उल्हासनगर परिसरात राहणारी सनम करोतिया या महिलेची दिवसाढवळ्या हागार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैदही झाला होता,
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दोघांपैकी एक मारेकरी बाबू ढकणी याला तासाभरात अटक केली होती, तर त्याचा दुसरा साथीदार दीपक ठाकूर याला शनिवारी बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हे दोघेही सराईत गुन्हेगार असून या हत्येमागील कारण पोलिसांनी स्पष्ट केले आहे, मृतक सनम हिचे एका अज्ञात व्यक्ती बरोबर अनेतिक संबंध असल्याने त्याचा राग मनात धरून तिचा नवरा बाबु उर्फ सचिन करोतीया याने तिची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची कबुली दिली आहे, आज या दोन्ही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दोघांना अधिक पोलिस कोठडी सुनावली आहे,

सर, बातमीसाठी काल पाठवले व्हिडीओ वापरणे

Conclusion:
Last Updated : Jul 6, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.