ETV Bharat / city

भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार ; परिसरात अफवांमुळे 'राडा'

एका अल्पवयीन मुलीला मोबाइल व पैशांचं आमिष दाखवून अपहरण केल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. यानंतर तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कारासह पॉक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

minor girl kidnapped in bhiwandi
भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार ; परिसरात अफवांमुळे 'राडा'
author img

By

Published : Nov 25, 2020, 6:09 PM IST

ठाणे - एका अल्पवयीन मुलीला मोबाइल व पैशांचं आमिष दाखवून अपहरण केल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. यानंतर तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कारासह पॉक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संतोष सोनी आणि इरशाद अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार ; परिसरात अफवांमुळे 'राडा'

अपहरण करून घरात कोंडलं

16 वर्षांची पीडिता राहत असलेल्या परिसरातच आरोपी संतोष याची पान टपरी आहे. यामुळेच दोघांची ओळख झाली. पीडित मुलगी त्याच्या पानटपरीवर येत होती. त्यात वेळी पैसे आणि मोबाइलचे आमिष दाखवत संतोषने डाव साधला. त्याने 12 नोव्हेंबर रोजी अपहरण करून तिला स्वतःच्या घरात कोंडून ठेवले होते. मात्र पीडित मुलीच्या वडिलांना याचा सुगावा लागताच त्यांनी आरोपीकडे मुलीविषयी विचारणा केली. यावेळी संतोष आणि इरशाद अन्सारी यांनी त्यांना धमकी देत हाकलून लावले. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी 21 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंसक जमाव नियंत्रणात

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ शोध घेत पीडितेला वडिलांच्या स्वाधीन केले. मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुलीसोबत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत काल रात्रीच्या सुमारास दोघांना अटक केली आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संतप्त जमावाने त्याला जातीय रंग देऊन अफवा पसरवली. यामुळे आरोपीचे हॉटेल व पानटपरीवर दगडफेक करून काही लोकांनी तोडफोड केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या तोडफोडीनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. आजही या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सह पोलीस निरीक्षक एन.पी. पवार करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.