ETV Bharat / city

...अन् वेगळे काम करायेच असे आमचे धोरण नाही - जयंत पाटील - जयंत पाटील

आम्ही एकत्र सरकारमध्ये काम करतोय, एकत्र सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आमचे धोरण नाही, महाविकास आघाडीतील पक्ष जिथे-जिथे एकत्रीत राहतील त्याला प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Oct 25, 2021, 10:33 PM IST

ठाणे - आम्ही एकत्र सरकारमध्ये काम करतोय, एकत्र सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आमचे धोरण नाही, महाविकास आघाडीतील पक्ष जिथे-जिथे एकत्रीत राहतील त्याला प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यातील आगामी महापालिकेसह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होईल का, या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

बोलताना जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील सोमवारी कल्याणात जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन व कार्यकर्ता मार्गदर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कल्याण अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश प्रवक्ता महेश तपसे, जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील आदी मान्यवर होते.

त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा उभारी घेईल

मंत्री पाटील पुढे म्हणाले, एकेकाळी कल्याण-डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होता. राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल, असे त्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्याची दुरवस्था झाली, दुरावस्तेमुळे अनेक अपघात ही घडले. याला तत्कालीन सरकार जबाबदार आहे. या रस्त्यांना प्राधान्य देऊ आणि ते प्रश्न सोडवू, असे मंत्री पाटील म्हणाले.

माजी आमदार पप्पू कलानीबाबत सावध, तर कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानीबाबत पत्रकारानी मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न विचारले असता, ते म्हणाले, त्यांच्या समाजाचा सण होता, त्यानिमित्ताने त्यांना भेटलो आणि जेवण केले. राजकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मंत्री पाटील सांगितले. दरम्यान, कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मंत्री आणि पदाधियकऱ्यांच्या गर्दीमुळे कल्याणकर नगरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्टेशनकडे जाण्यासाठीचा सरळ मार्ग काही काळ थांबवून तेथील वाहतूक सहजानंद चौकातून पुन्हा महाराज चौकातून स्टेशन परिसरात वळवण्यात आली होती. त्यामुळे नगरीकांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा - Diwali 2021 : १७६ देशात डोंबिवलीतील दिवाळी फराळाला पसंती; मात्र महागाईमुळे विक्रीवर परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.