ETV Bharat / city

समोसा तळताना किळसवाणा प्रकार; मराठा एकीकरण समितीची पोलिसांकडे धाव - etv bharat maharashtra news

कल्याण पूर्वेतील एका हॉटेलमध्ये एक कामगार समोसा तयार करण्यासाठी लागणारी मैदाची पुरी लाटून ती समोसा, पुरी तळणाऱ्याच्या घामाने भरलेल्या उघड्या मांडीवर ठेवतानाचा किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मराठा एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिसांकडे धाव घेऊन कारवाईसाठी लेखी तक्रार दाखल केली आहे.

न
author img

By

Published : Oct 18, 2021, 5:22 PM IST

ठाणे - कल्याण पूर्वेतील एका हॉटेलमध्ये एक कामगार समोसा तयार करण्यासाठी लागणारी मैदाची पुरी लाटून ती समोसा, पुरी तळणाऱ्याच्या घामाने भरलेल्या उघड्या मांडीवर ठेवतानाचा किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मराठा एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिसांकडे धाव घेऊन कारवाईसाठी लेखी तक्रार दाखल केली आहे.

समोसा तळताना किळसवाणा प्रकार; मराठा एकीकरण समितीची पोलिसांकडे धाव

मराठी एकीकरण समितीने केले समोसा तयार करतानाचे चित्रीकरण

रविवारी (17 ऑक्टोबर) मराठी एकीकरण समितीची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व कार्यकर्त्यांना अल्पोहार म्हणून समोस, व्हेफर्स, पेढा देण्याचे ठरले होते. त्यानुसार मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्याने कल्याण पूर्वेतील काटेमानेवली येथील शंकर हॉटेलच्या मालकाला आर्डर दिली होती. बैठक संपल्यावर कार्यकर्ते समोसे आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना समोसा तयार करणाऱ्या एक कामगार पुरी लाटून तीच पुरी समोसा बांधून तळणाऱ्याच्या मांडीवर ठेवून समोसा तयार करत असल्याचे दिसून आले. यामुळे मराठी एकीकरण समितीने हॉटेल मालकाला दिलेली आर्डर रद्द करून किळसवाण्या प्रकाराचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

खाद्यपदार्थातील किळसवाणे प्रकार कधी थांबणार..?

विशेष म्हणजे समितीचे पदाधिकरी जेव्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव तक्रार देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना पोलिसांनी ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला. यामुळे किळसवाणे समोसे तयार करणाऱ्या हॉटेल मालकावर कारवाई कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर आजपर्यंत विविध खाद्यपर्दाथ तयार करतानाचे बहुतांश व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे तुम्ही पहिले असतील, ज्यामध्ये वडा, पाणीपुरी, भेळ, लींबू शरबत, बेकरीमधील खाद्य आदी खाद्यपदार्थांचा किळसवाणा प्रकारचे व्हिडिओ समोर आल्याने काही दिवस यावर चर्चा होऊन संबधीतावर कारवाई करण्यात येते. मात्र, खाद्यपदार्थाबाबतचे किळसवाणे प्रकार थांबताना दिसत नाहीत. यामुळे असे प्रकार कधी थांबणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला आहे.

हेही वाचा - धावत्या रेल्वेत गुटखा विक्रीच्या वादातून झालेल्या राड्यात एक गंभीर, दोघे अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.