ETV Bharat / city

खळबळजनक! प्रेयसीवर भर रस्त्यात चाकूने वार करून प्रियकराचा स्वतःच्या गळ्यावर वार - thane crime news

भर रस्त्यात प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयन्त केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम येथे समोर आली आहे. रेती बंदर परिसरात घडलेल्या घटनेत पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

thane crime news
भर रस्त्यात प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयन्त केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम येथे समोर आली आहे.
author img

By

Published : Mar 2, 2020, 7:30 PM IST

Updated : Mar 2, 2020, 10:17 PM IST

ठाणे - भर रस्त्यात प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयन्त केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम येथे समोर आली आहे. रेती बंदर परिसरात घडलेल्या घटनेत पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घनश्याम देवरशेट्टी असे आरोपीचे नाव आहे.

खळबळजनक! प्रेयसीवर भर रस्त्यात चाकूने वार करून प्रियकराचा स्वतःच्या गळ्यावर वार

डोंबिवली पश्चिमेतील रेती बंदर रोड परिसरात आरोपी घनश्याम राहत असून तो एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. तर पीडित तरुणी याच परिसरातील एका खासगी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्समध्ये काम करते. या दोघांमध्ये काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते. मात्र काही दिवसांपासून पीडित तरुणी प्रेमसंबंध ठेवण्यास वारंवार नकार देत होती. यामुळे चिडलेल्या घनश्यामने दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी पीडितेला भर रस्त्यात गाठत तिच्या चेहऱ्यावर धारदार चाकूने वार केले. यानंतर त्याने स्वतः च्या गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेला त्याच्या तावडीतून सोडवले; आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अद्याप संबंधित तरुणीवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी घनश्यामला रुग्णालयात दाखल केले. आरोपी धनश्याम दोन दिवसांच्या उपचारानंतर बरा झाल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज सकाळी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी तुषार साळुंखे करत आहेत.

Last Updated : Mar 2, 2020, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.