ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरून अत्यावश्यक सेवेसाठी धावणाऱ्या वाहनचालकांना तसेच महामार्गावरून पायी जाणाऱ्या मजुरांसाठी शहापूर तालुक्यातील खर्डी येथे मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेल फाउंटनचे मालक हाफिजी फरहान डुक्का यांनी जवळपास 300 चालकांसह पायी जाणाऱ्यांसाठी ही सोय केलीय.
ठाण्यातील 'या' हॉटेलमध्ये मोफत जेवण; वाटसरूंना मिळाला आधारठाण्यातील 'या' हॉटेलमध्ये मोफत जेवण; वाटसरूंना मिळाला आधारठाण्यातील 'या' हॉटेलमध्ये मोफत जेवण; वाटसरूंना मिळाला आधार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशात अत्यावश्यक सेवा देणाऱया कर्मचाऱयांचे अनेक ठिकाणी हाल होत आहेत. त्यामध्ये दुधाचे टँकर, मेडिकलच्या वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, भाजीपाला तसेच रुग्णवाहिका, संचारबंदीत अडकलेली वाहने यांच्या चालकांना खर्डी येथील हॉटेल फाउंटनचे मालक देवदूत ठरत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून 300 वाहनचालक व पायी जाणाऱया मजूरांना त्यांनी मोफत अन्न पुरवले आहे.
दरम्यान, मुंबई,ठाणे,कल्याण,भिवंडी, तसेच नाशिक,मालेगाव, धुळे,जळगाव वरून येणाऱ्या वाहनचालकांना खर्डीतील फाउंटन हॉटेल जेवणासाठी हक्काचं ठिकाण बनलयं. यामुळे परिसरात हॉटेल मालकाचे कौतुक होत आहे.