ETV Bharat / city

कोरोनामुळे डोंबिवलीच्या दिवाळी पहाटवर पोलिसांच्या जमावबंदी आदेशाने विरजण

फैलावलेल्या जागतिक महामारीच्या कोरोनामुळे डोंबिवलीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमावर यंदा विरजण येणार आहे. अभ्यंगस्नान करून दिवाळीचा पहिला मंगलमय दिवस डोंबिवली पूर्वेकडील फडके रस्त्यावर पहाटे साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदा प्रथमच करोना संसर्गाच्या भीतीने खंडित होणार आहे.

Curfew order in Dombivli
डोंबिवलीत जमावबंदी
author img

By

Published : Nov 13, 2020, 4:38 PM IST

डोंबिवली (ठाणे) - फैलावलेल्या जागतिक महामारीच्या कोरोनामुळे डोंबिवलीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमावर यंदा विरजण येणार आहे. अभ्यंगस्नान करून दिवाळीचा पहिला मंगलमय दिवस डोंबिवली पूर्वेकडील फडके रस्त्यावर पहाटे साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदा प्रथमच करोना संसर्गाच्या भीतीने खंडित होणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थानचे ग्रामदैवत गणपती मंदिर शासन निर्णयाप्रमाणे मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. दिवाळीच्या दिवशीही ते खुले होणार नसल्याने भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. तर दुसरीकडे डोंबिवली शहरातील समस्त नागरिकांनी फडके रोडवर जमावबंदीचे पोलिसांनी आदेश लागू केल्याने गर्दी करू नये, असे आवाहन करणारे फलक पोलिसांनी जागोजागी लावले आहेत.

सांस्कृतिक वातावरणात दिवाळीचे स्वागत यंदा नाहीच..
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अभ्यंगस्नान करून, नवीन कपडे परिधान करून हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणींसह ज्येष्ठ मंडळीही श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी फडके रस्त्यावर जमतात. मागील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा म्हणजे डोंबिवलीचा एक उत्सवच मानला जातो. याच फडके रोडवर कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या ठाणे, मुंबई, कर्जत, कसारापासून दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी तरुणाई अवतरत असते. फडके रस्त्यासह आजूबाजूचे गल्लीबोळ वाहनांसह तरुण-तरुणींच्या गर्दीने फुलून जातात. तरुण-तरुणी पारंपरिक वेश परिधान करून नटूनथटून येतात. प्रत्येकाने आपल्या मित्र-मैत्रिणींना दीपावली व नववर्षाच्या शुभेच्छा देतात. तरुण-तरुणींच्या अलोट गर्दीने गणेश मंदिर परिसरातील चारही बाजूंचे रस्ते फुलून जातात. पारंपरिक पेहरावात पूर्वेतील फडके रोडवर उसळणारी तरुणाई, त्यांच्यासाठी आयोजित केलेले गीत-संगीताचे कार्यक्रम आणि ठिकठिकाणची नाट्यगृहे, सभागृहांत रंगलेल्या दिवाळी पहाटेच्या मैफली अशा सांस्कृतिक वातावरणात दिवाळीचे स्वागत कल्याण-डोंबिवलीत करण्यात येते. वाद्यवृंद, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च मेजवानी दिवाळी पहाटनिमित्त श्री गणेश मंदिर संस्थान, अन्य सामाजिक संस्थांतर्फे फडके रोडवर दिली जाते. पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिवाळी उत्साहाचा माहोल फडके रोडवर पाहण्यास मिळतो. परंतु यंदा करोनाच्या संसर्गाने मंदिर संस्थानने एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. फडके रोडच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाश्यांनी दिवाळीच्या दिवसापुरता या भागात जमावबंदी आदेश पोलिसांनी लागू करावा, अशी मागणी केली आहे.

ठाण्यात कलम 144 प्रमाणे लागू असून जमावबंदीचा आदेश -
या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फडके रोड, इंदिरा चौक परिसरात फलक लावण्यात आले आहेत. मार्चपासून सर्वजण कोव्हीड - 19 चा समर्थपणे मुकाबला करत दैनंदिन जीवन जगत आहेत. दिवाळी पहाटच्या निमित्ताने फडके रोडवर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दिपावलीपूर्वी खरेदीसाठी, तसेच दिपावलीच्या दिवशी नेहरु रोड, फडके रोडसह शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करुन जमू नका, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा, सामाजिक अंतर राखून रोगाचा प्रादुर्भाव टाळा, असे आवाहन या फलकावर करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशानुसार आयुक्तालय परिसरात सीआरपीसी कलम 144 प्रमाणे लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही या फलकामार्फत देण्यात आला आहे. यंदाचा दिवाळी सण सर्वांनी कोव्हीड 19 च्या नियमांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांकडून नाकाबंदी -
दिवाळी पहाटनिमित्त शनिवारी फडके रोडवर तरुणांची गर्दी जमण्याची शक्यता असल्याने पोलीस व केडीएमसीच्या वतीने गर्दी जमू न देण्याचे नियोजन केले जात आहे. फडके रोडवरील बाजीप्रभू चौक, गणपती मंदिराकडील बाजू बंदिस्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आगरकर रस्ता, टिळक रस्ता, नेहरू रस्ता पहाटे ते दुपारपर्यंत वाहनांसाठी बंद करण्याचा विचार सुरू आहे. लोकलमधून प्रवासाला मुभा नसल्याने फडके रोडवर दिवाळी साजरी करण्यासाठी ठाणे, बदलापूर, 27 गावे, पलावा सिटी, कल्याण परिसरातील तरुण चारचाकी, दुचाकीने येण्याची शक्यता असल्याने हे नियोजन केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.