ठाणे - भाजप नेते किरीट सोमैया यांच्या विरोधात शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब आणि, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मानहाणीचा दावा करणार असल्याचे नुकतेच पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावर किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे मला आतापर्यंत मानहानीच्या सहा नोटीसा आल्या आहेत. ठाकरे सरकार वसुली पण १०० कोटींची करते, आणि मानहानीचा दावा पण १०० कोटींचाच करते, अशी खोचक टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली. ते कल्याणामध्ये भाजपच्या कार्यक्रमांना आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला.
किरीट सोमैया पुढे म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही. सरकारचे घोटाळे मी तडीस नेणार आहे. उद्धव ठाकरे यांचा स्वतःच्या १९ बंगल्याच्या घोटाळ्यासह अनिल परबचा रिसॉर्ट असो, की हसन मुश्रीफ यांचा साखर कारखाना असो, या सगळ्या घोटाळ्यांना मी तडीस नेणार आहे. तसेच या सगळ्यांवर योग्य ती कारवाई होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हसन मुश्रीफ यांचा साखर कारखाना बेनामी साखर कारखाना आहे. त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आयकर विभाग आणि इडीकडे केली असून त्याची चौकशी सुरु झाली केल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या माजी नगरसेवकाने चूक केली असेल तर ..
केडीएमसीचे भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात एका तरुणीने केलेल्या आरोपानंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात विरोधात विनयभंगासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना सोमैया यांनी कुणी काही चूक केली असेल तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे योग्य चौकशी व्हायला हवी, असे स्पष्ट केले.
हेही वाचा - मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर; मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुताम्यांना करणार अभिवादन
हेही वाचा - किरीट सोमैयांनी 'ईडी'कडे सुपूर्द केले 2 हजार 700 पानांचे पुरावे, मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
हेही वाचा - मंत्री अनिल परब ठोकणार सोमैयांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, पाठवली नोटीस