ETV Bharat / city

जामीनसाठी मदत केली नाही म्हणून गुंड मुकेशचा खून; आरोपी शेर खानला गुजरातमधून अटक

कल्याण पश्चिमेकडील हायप्रोफाईल गोदरेज हिल परिसरातल्या रस्त्यावर गुरुवारी (दि. 7) रात्रीच्या सुमारास मुकेश उर्फ मुक्या रमेश देसाईकर (वय 22 वर्षे) या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती. त्याची हत्या त्याचाच गुंड मित्र शेर खान याने केली असून जामीनसाठी मदत न करता तुरुंगातील बाहेर आल्यानंतर मारहाण केल्याच्या रागातून हत्या केल्याची कबूली आरोपीे पोलिसांसमोर दिली.

author img

By

Published : Oct 14, 2021, 9:32 AM IST

म

ठाणे - कल्याण पश्चिमेकडील हायप्रोफाईल गोदरेज हिल परिसरातल्या रस्त्यावर गुरुवारी (दि. 7) रात्रीच्या सुमारास मुकेश उर्फ मुक्या रमेश देसाईकर (वय 22 वर्षे) या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती. मुकेशला ठार मारणाऱ्याला खडकपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुजरात राज्यातील एका गावातून जेरबंद केले आहे. तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी जामीनसाठी मदत केली नाही उलट तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मारहाण केल्यामुळे खून केल्याचा कबुली जबाब आरोपीने पोलिसांसमोर दिला. शेरखान गुलामुद्दीन खान (32 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील बापगावात असलेल्या एका लॉजमध्ये राहणारा आहे. कल्याण न्यायालयाने या मारेकऱ्याला अधिक चौकशीसाठी 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे मृत व आरोपी हे जिवलग मित्र होते.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

मृतावर डझनभर गंभीर गुन्ह्यांची नोंद

मुकेश उर्फ मुक्या रमेश देसाईकर याचा मृतदेह गुरुवारी रात्री पावणेकराच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील साई उद्यान गार्डन बाहेरच्या रोडवर मुकेश उर्फ मुक्या याचा मृतदेह आढळून आला. हा गुंड कल्याणजवळच्या बारावे गावात राहत होता. मुक्याचा भाऊ महेंद्र देसाईकर याने शेर खान याच्यावर संशय व्यक्त करत तसा खडकपाडा पोलीस ठाण्यात जबाब दिला होता. मुकेशच्याविरोधात सुमारे डझनभर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मुक्याने कल्याणमध्ये मोठी दहशत निर्माण केली होती. तडीपारीची प्रक्रिया रद्द करून कल्याणला परतलेल्या मुक्याने आपल्या साथीदारांसह पुन्हा दहशत पसरवायला सुरुवात केली होती. त्याची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज होता. मुक्याला शेर खान यानेच ठार मारल्याचा संशय त्याच्या भावाने संशय व्यक्त केला होता. त्यानुसार शेरखानचा शोध पोलीस घेत होती.

शेर खानला गुजरातमधील पंचमहल गावातून अटक

खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, जमादार मधुकर दाभाडे, सुनील पवार, नवनाथ डोंगरे आणि राजू लोखंडे हे पथक भूमिगत झालेल्या शेर खानचा माग काढण्यात यशस्वी झाले. पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील गोध्रा परिसरातील पंचमहल गावातून गाठले शेर खानला ताब्यात घेतले.

आरोपी व मृत जिवलग मित्र

मृत मुकेश देसाईकर आणि त्याचा मारेकरी शेर खान हे दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री होती. एका गुन्ह्यात हे दोघेही एकत्र तुरूंगात होते. शेर खानला जामीन मिळाला नाही. पण, मुकेशला लवकर जामीन झाला आणि तो तुरुंगाबाहेर आला. मुकेशने आपल्या जामिनासाठी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही त्याचा शेर खानला राग होता. शिवाय तुरूंगातून सुटून बाहेर आल्यानंतर मुकेश आपणास मारहाण करायचा. म्हणून आपण त्याला संपवल्याची कबूली शेर खानने पोलिसांना दिली.

दोघांवरही दाखल आहेत गंभीर गुन्हे

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले की, यातील मुकेश देसाईकर याला 3 वेळा तडीपार करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर 2 वेळा एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अंमली पदार्थांची नशा करणाऱ्या मुकेशच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. तर आरोपी शेर खान हा मुकेशचा मित्र असून त्याच्यावरही गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. मुकेशची हत्या केली त्यावेळी शेर खानकडे मोबाईल नव्हता. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीपर्यंत आम्हाला पोहोचता आल्याचेही पवार यांनी म्हणाले.

हेही वाचा - कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांची वादग्रस्त दबंगगिरी; नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराचे फोडले डोके

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.