ETV Bharat / city

श्रीरामाच्या भक्तीमुळेच सर्वकाही...तब्बल 33 वर्षांपासून ते करतयेत रामनामाचा जप

रामावरील श्रद्धेपोटी एका शेतकरी भक्ताने १९८७ पासून वहीत रामनाम लिहिण्याचा जप सुरू केला. तो आजही नित्यनियमाने सुरूच आहे. अयोध्येत राम मंदिरांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने हा राम भक्त समाजासमोर आला आहे.

author img

By

Published : Aug 5, 2020, 2:07 PM IST

Ram nam jap news
श्रीरामाच्या भक्तीमुळेच सर्वकाही...तब्बल 33 वर्षांपासून ते करतयेत रामनामाचा जप

ठाणे - अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्याचा प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे रामाची भक्ती करणारे कोट्यवधी भाविक आपापल्यापरीने श्रद्धा ठेवून पूजाअर्चा करत असतात. मात्र रामावरील श्रद्धेपोटी एका शेतकरी भक्ताने १९८७ पासून वहीत रामनाम लिहिण्याचा जप सुरू केला. तो आजही नित्यनियमाने सुरूच आहे. अयोध्येत राम मंदिरांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने हा राम भक्त समाजासमोर आला आहे.

भिवंडीतील काल्हेर येथील शेतकरी पंढरीनाथ दगडू तरे हे 83 वर्षीय वृद्धाने रामाच्या श्रद्धेपोटी दररोज रामनामाचा जप करण्यात सुरुवात केली. हा जप ते वहीत लिहितात. मागील 33 वर्षांपसून हा नित्यक्रम सुरू असून एका मागून एक अशा जवळपास 60 वह्या आतापर्यंत राम नामाच्या जपाने भरल्या आहेत. विशेष म्हणजे राम भक्त पंढरीनाथ यांनी प्रत्येक वहीस क्रमांक व प्रत्येक दिवसाची दिनांक त्यावर लिहून ठेवण्याची सवय लावली.

आज 33 वर्ष नित्यनेमाने राम नामाच्या जपचे लिखाण सुरू असून जो पर्यत हातपाय डोळे धडधाकड आहे. तोपर्यत राम नामाच्या जपचे लिखाण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आज प्रभू श्री राम यांची जन्मभूमी असेलेल्या अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचे भूमिपूजन होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केलाय. मात्र, ते आता उभारले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.