ETV Bharat / city

Azadi Ka Amrit Mahotsav : बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणारी शिक्षिका; आत्तापर्यंत पटकावले ६२ पुरस्कार - बाहुल्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणारी शिक्षिका

बाहुल्यांच्या खेळामधून मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास जिल्हा परिषद शिक्षिका सरला कामे - कुमावत ( Zilla Parishad Teacher Sarla Kame Kumavat ) यांनी घेतला आहे. त्यातूनच आता आझादी का अमृत ( Azadi Ka Amrit Mahotsav ) महोत्सव अंतर्गत त्या देशाच्या तिरंगा ध्वजबाबत जनजागृती करण्याचे काम करत आहेत.

Azadi Ka Amrit Mahotsav
Azadi Ka Amrit Mahotsav
author img

By

Published : Aug 10, 2022, 6:49 PM IST

Updated : Aug 10, 2022, 7:20 PM IST

औरंगाबाद - लहान मूल आणि बाहुली हे समीकरण अगदी वेगळच आहे. बाहुल्यांशी खेळताना मुलं सगळ जग विसरतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास जिल्हा परिषद शिक्षिका सरला कामे - कुमावत ( Zilla Parishad Teacher Sarla Kame Kumavat ) यांनी घेतला आहे. त्यातूनच आता आझादी का अमृत ( Azadi Ka Amrit Mahotsav ) महोत्सव अंतर्गत त्या देशाच्या तिरंगा ध्वजबाबत जनजागृती करण्याचे काम करत आहेत. या आधी अनेक सामाजिक चळवळ त्यांनी राबवल्यामुळे २५ राष्ट्रीय आणि २० राज्य स्तरीय पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.

बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या शिक्षिका

हर घर तिरंगा बाबत अभियान : १५ ऑगस्ट २०२२ ला भारताला ७५ वर्ष पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून भारत सरकार हर घर तिरंगा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचा भाग होण्यासाठी अजिंठा जवळील शिवना जिल्हा परिषद शाळेत कार्यरत सरला कामे - कुमावत यांनी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भागातील शाळांमधे, गावांमधे जाऊन बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागरण करित तिरंगा कसा फडकवायचा, ध्वज फडकविताना काय नियम पाळावे लागतात. तिरंगा ध्वज फटका नसावा, घान नसावा, देशाच्या जवांना सल्युट कसा करावा, जवानांचे योगदान याबाबत त्या माहिती आणि जनजागृती करत आहेत. आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वेगवेगळ्या विषयांवर केली जनजागृती : सरला कामे - कुमावत या २००९ पासून बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग करतात. वेगवेगळ्या विषयांना घेऊन त्या लहान मुलांसह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करतात. आता पर्यंत त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, महिला सुरक्षा, अंधश्रद्धा, स्वच्छ भारत अभियान, एड्स जनजागृती या विषयांवर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून माहिती देण्याचे आणि जागरूक करण्याचे काम केले. त्यांच्या बोलक्या बाहुल्यांचा डंका जिल्ह्यासह राज्यात आणि देशात गाजत आहेत. मात्र विदेशातही अनेकांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

आतापर्यंत पटकावले ६२ पुरस्कार : सरला कामे - कुमावत यांच्या कलेमुळे त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणजे सरकारी जवाई असे म्हणले जाते. मात्र शिक्षिका असलेल्या सरला कामे यांनी आपल्या कलेतून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत इतर ज्ञान देऊन समाजात जागरूकता निर्माण करू शकतो हे दाखऊन दिलं. त्यांना २०१५ - २०१६ या शैक्षणिक वर्षात आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. तर आता पर्यंत २५ राष्ट्रीय पुरस्कार, २० राज्य स्तरीय पुरस्कार आणि इतर स्थानिक सामाजिक संस्थांनी दिलेले असे एकूण ६२ पुरस्कार सरला कामे - कुमावत यांनी पटकवले आहेत. देशाचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष मनवल जात आहे. या काळात देशाने आपली वेगळी छाप जगात पाडली आहे. त्यात अशा आदर्श शिक्षकांचा देखील मोलाचा वाटा नाकारता येणार नाही.

हेही वाचा - Har Ghar Tiranga : बँड वाजवून पोलीसांनी केली हर घर तिरंगा अभियानाची जागृती,पिंपरी पोलीसांचा उपक्रम

Last Updated : Aug 10, 2022, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.