ETV Bharat / city

घिसीपीटी लाईफ मैं नही जिना चाहता... स्टेट्स ठेवून 19 वर्षीय तरुणाने उचलले हे पाऊल

वैभव फापाळे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Youth suicide in Aurangabad) केली. ही घटना सोमवारी ( २२ नोव्हेंबर) पहाटे 4 वाजता उघडकीस आली आहे. हा तरुण शहरातील एका महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होता. वैभवचे वडील नोकरीनिमित्त नायजरिया देशात गेले आहेत.

स्टेटस ठेवून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

author img

By

Published : Nov 22, 2021, 4:06 PM IST

Updated : Nov 22, 2021, 5:17 PM IST

औरंगाबाद - वयाच्या बावीसाव्या वर्षांपर्यंत शिक्षण, पंचवीसपर्यंत नोकरी, सव्वीस वर्षाला विवाह, तिसाव्या वर्षी मुले आणि साठाव्या वर्षी निवृत्ती. त्यानंतर मृत्यूची वाट पाहायची. असे रटाळ जीवन नको, असे स्टेट्स ठेवत 19 वर्षीय तरुणाने मयूर नगर हडको परिसरात आत्महत्या केली आहे. वैभव राजेंद्र फापाळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वैभव फापाळे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Youth suicide in Aurangabad) केली. ही घटना सोमवारी ( २२ नोव्हेंबर) पहाटे 4 वाजता उघडकीस आली आहे. हा तरुण शहरातील एका महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होता. वैभवचे वडील नोकरीनिमित्त नायजरिया देशात गेले आहेत. वैभव हा आई-बहिणीसह राहत होता. रविवारी त्याची आई व बहीण घरमालकीण सोबत एका लग्न समारंभासाठी गेले होते. तर वैभव परीक्षा असल्याने घरीच होता.

स्टेटस ठेवून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

हेही वाचा-रिसोडमध्ये बिछायत गोडाऊनला आग; एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

आई-बहीण रात्री घरी आल्यानंतर त्या झोपी गेल्या होत्या. मात्र, पहाटेपर्यंत लाईट सुरू असल्याने त्यांनी दार लोटून पाहिले असता वैभवने गळफास घेतला होता. त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रटाळ जीवन जगण्याची इच्छा नाही (अभिनेता रणबीर कपूरचा ऐसी घिसीपीटी लाईफ मैं नही जिना चाहता डायलॉग) असे स्टेटस ठेऊन या तरुणाने मृत्यूपूर्वी ठेवले. पुढील तपास सहाय्यक फौजदार ए. आर. इराक करीत आहेत.

हेही वाचा-म्हसरुळमध्ये २८ वर्षीय तरुणाची हत्या; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्येची दुसरी घटना
सदानंद नगर सातारा परिसरात ५९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना रविवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. बाळू सखाराम धनेधर ( वय ५९ रा. सदानंद नगर सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळू यांचे चहाची हॉटेल असून यावर त्यांचा चरितार्थ चालत होता. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. त्यांची पत्नी त्यांना व्यवसायात मदत करते. गेल्या काही दिवसांपासून बाळू हे आजारपणामुळे त्रस्त होते. रविवारी हॉटेलवर असताना बाळू हे घरी एकटेच होते. पत्नी घरी आल्यानंतर बघितले असता त्यांनी पतीने गळफास घेतल्याचे आढळले. यावेळी त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल (Aurangabad Ghati Hospital) करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात (Satara Police station in Aurangabad) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रभान गवांदे करीत आहेत.

हेही वाचा-Yavatmal Crime: पुण्याला जात होती पत्नी, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पतीसह ४ आरोपींना अटक

तिसरी घटना...
विठ्ठल नगर नारेगाव येथील ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना शनिवारी तीन वाजता उघडकीस आली. सुहास देविदास जाधव (वय ४० रा.गल्ली न.३ विठ्ठल नगर नारेगाव) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान, तीन दिवसांत तीन आत्महत्येच्या घटना घडल्याने (three suicide in three days in Aurangabad) मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

Last Updated : Nov 22, 2021, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.