औरंगाबाद - कचऱ्याच्या गाडीची धडक लागल्याने पतिपत्नी ठार झाल्याची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. जळगाव रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश सुर्यभान जाधव (३५) आणि पत्नी मोनिका प्रकाश जाधव (२८, रा. शहानूरवाडी, औरंगाबाद) हे बीड बाय पासवर एका कॉलेजजवळ भाजीपाला विक्री करतात. दुकानातील भाजीपाला संपल्याने सकाळी जाधववाडी परिसरातील बाजार समितीतून भाजीपाला घेऊन जात असताना हा अपघात झाला.
बीड बायपास परिसरात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत असताना जाधववाडी परिसराजवळ जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वराला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी हे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस तपास करीत आहे. दुकानातील भाजी संपल्यामुळे सोमावारी सकाळी ते जाधववाडी येथे खरेदीसाठी गेले होते. भाजी खरेदी करुन परत येत असताना सिडको बसस्थानक ते जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रकने (एम.एच. २० ई.एल.००८०) त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये दोघे पती, पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस तपास करीत आहे.
धक्कादायक; कचऱ्याच्या गाडीच्या धडकेत पती-पत्नी ठार - रिलायन्स पेट्रोल पंप
जाधववाडी परिसराजवळ जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वराला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी हे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.