ETV Bharat / city

पंतप्रधान मोदींनी राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी करावी - विनोद पाटील - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच आपले वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते, असे विनोद पाटील (Vinod Patil) म्हणाले.

vinod patil
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील
author img

By

Published : Feb 28, 2022, 4:31 PM IST

Updated : Feb 28, 2022, 9:47 PM IST

औरंगाबाद - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी तत्काळ माफी मागावी. तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केली आहे.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील

राज्यपाल कोश्यारी यांना निवृत्तीची गरज - विनोद पाटील

रविवारी राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादेत नवीन जावईशोध लावला आहे. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपले वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते, असे विनोद पाटील म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आवाहन करतो की तत्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणीही विनोद पाटील यांनी केली आहे.

समर्थ नसते तर शिवाजी नसते - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले. समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Feb 28, 2022, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.