ETV Bharat / city

धूत बंधुंना अटक करुन मालमत्ता जप्त करा; औरंगाबादेत व्हिडिओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

औरंगाबादमधील व्हीडीओकॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांचे 58 हजार 730 कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. गेल्या 17 महिन्यांपासूनचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयावर मोर्चा काढला. राजकुमार धुत यांना अटक करुन त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

व्हीडीओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
व्हीडीओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Jan 24, 2020, 1:08 PM IST

औरंगाबाद - गेल्या 17 महिन्यांपासून थकीत वेतन न मिळाल्यामुळे व्हिडिओकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयावर मोर्चा काढला. राजकुमार धुतला अटक करुन मालमत्ता जप्त करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांची जोरदार घोषणाबाजी कर्मचाऱ्यांनी केली.

धूत बंधुंना अटक करुन मालमत्ता जप्त करा

थकीत वेतनासाठी व्हीडीओकॉन कामगारांच्या उपोषणाला १५० दिवस पुर्ण झाले. शिवाय भीक मांगो आंदोलन करुन धूत बंधूंना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत 721 रुपये पाठवण्यात आले. मात्र उपोषणाची कोणीही दखल घेतली नाही. अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयावर मोर्चा काढला. मोर्चाचा मार्ग क्रांती चौकातून पैठण गेट, टिळक पथ, खडकेश्र्वर, सिटी चौक, शहागंज, फाजल पुरा तसेच विभागीय आयुक्त कार्यालय असा होता. यावेळी प्रचंड घोषणबाजी करण्यात आली.

राजकुमार धूतला अटक करुन ५८ हजार ७३० कोटी रुपयांचे कर्ज वसूल करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कामगारांना भेटायला वेळ द्यावा अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी यावेळी केल्या. कामगार उपाशी असतांना धूत बंधू ऐशोआरामात आहेत. ते शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला धूत बंधूंचा हा दरोडा आणि कामगारांना उपाशी ठेवणे मान्य आहे का? असा सवालही कामगारांनी उपस्थित केला. मात्र याबाबत शिवसेनेचे मौन आहे. याबाबत २४ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. धूत बंधू करीत असलेल्या छळाला शिवसेनेचा पाठींबा आहे का? असा प्रश्नही कामगार उपस्थित करीत आहेत. शिवाय चंदा कोचर यांच्यावरील कारवाईप्रमाणे धूत बंधूवर देखील कारवाई करावी. धूत बंधुंना अटक करून त्यांची मालमता जप्त करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Intro:थकलेल्या वेतनासाठी व्हीडीओकाँन कामगारांच्या उपोषणाला १५० दिवस पुर्ण झाले असली तर आंदोलनाची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयावर मोर्चा काढला. Body:गेल्या १७ महीन्याचा कामगारांचा थकीत पगार द्या.या मागणीसाठी ३४० कामगार गेल्या १५० दिवसांपासून सहाय्यक कामगार उपाआयुक्त यांच्या कार्यालया समोर उपोषण करीत आहेत.कामगारांनी या पुर्वी भिक मागो आंदोलन करून धूत बंधूना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्फत ७२१/-रू पाठविले होते.

Conclusion:हा मोर्चा क्रांती चौकातून, पैठण गेट, टिळक पथ, खडकेश्र्वर, सिटी चौक, शहागंज, फाजल पुरा, विभागीय आयुक्त कार्यालय येथे गेला. मोर्चात प्रचंड घोषणबाजी करण्यात आली. १५० दिवसांचे उपोषण कशासाठी न्यायासाठी हक्कासाठी, राजकुमार धूत ला अटक झालीच पाहिजे, ५८७३० कोटी रुपयांचे कर्ज वसूल केलेच पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना कामगारांना भेटायला वेळ केंव्हा मिळेल जवाब दो, कामगारांचा थकीत पगार मिळालाच पाहिजे अश्या घोषणा दिल्या. कामगार उपाशी असतांना धूत बंधू बंगल्यात ऐशोआरामात आहेत. ते शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेनेला धूत बंधूंचा हा दरोडा आणि कामगारांना उपाशी ठेवणे मान्य आहे का? असा सवालही कामगारांनी उपस्थित केला. याबाबत शिवसेनेचे मौन आहे. या बाबत दि. २४/१२/२०१९ रोजी मूख्यमंञी उध्दव ठाकरे यांना ही निवेदन पाठविण्यात आले.परंतु आजपर्यंत कोणताही प्रतिसाद त्यांनी दिला नाही. धूत बंधू करीत असलेल्या छळाला शिवसेनेचा पाठींबा आहे का? असा प्रश्न ही पुन्हा एकदा कामगार उपस्थित करीत आहेत. शिवसेना, भाजपच्या नेत्यांना १५० दिवसाच्या या कामगार उपोषणाकडे फिरकावयास वेळ मिळाला नाही. चंदा कोचर यांना अटक, त्याची मालमता जप्त केली जानार मग धूत बंधूना अटक करून मालमता जप्त का केली जात नाही? असा प्रश्न आंदोलकांच्या वतीने उपस्थित करण्यात आला. शेतकर्यां साठी बँकेच्या विरोधात शिवसेना आली तसेच त्यांच्या स्वतःच्या खासदाराला ही ५८७३०/-कोटींचे कर्ज बँकेत जमा करावयास व कामगारांचा पगार द्यायलाही शिवसेनेने सांगावे. बँकेत पैसा आला तर शेतकऱ्यांना ही कर्ज देता येईल. अश्या मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.

Byte - अँड अभय टाकसाळ - कामगार नेते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.