औरंगाबाद : अंत्यविधी करताना लाकडांच्या होणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. वृक्षतोड होत असल्याने औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे Aurangabad Municipal Carporation ब्रिगेडचा म्हणजेच गट्टूचा वापर सुरू करण्यात use of gattu for funeral आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही स्मशानभूमीमध्ये लाकडा ऐवजी ब्रिकेट्स वापरले जात आहे. मात्र या गट्टूचा बाबत तक्रार Complaint to Aurangabad Municipal Administration देण्यात आली आहे. त्यामुळे सुरू करण्यात आलेला प्रयोग यशस्वी होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
लाकडाच्या ऐवजी अंत्यविधीला गट्टूचा वापर औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत पस्तीस स्मशानभूमी आहेत. त्या त्या परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी सोयीस्कर व्हाव्यात यासाठी या स्मशानभूमी वेगवेगळ्या भागांमध्ये तयार करण्यात आले आहेत. पारंपरिक पद्धतीने लाकडांवर अंत्यविधी दरवेळेस केले जातात मात्र लाकडांचा होणारा अतिवापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, असं नेहमीच म्हटलं गेलं. त्यामुळेच प्रायोगिक तत्त्वावर नवीन अनोखा प्रयोग महापालिकेतर्फे सुरू करण्यात आला. त्यामध्ये ब्रिगेड्स द्वारे अंत्यसंस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका शवाच्या अंत्यविधीसाठी साधारणतः तीन चार क्विंटल गट्टू लागतो. त्यामुळे पर्यावरण नियंत्रीत राहण्यासाठी मदत होईल असा दावा पालिकेने आणि पुरवठादार कंपनीने केला आहे.
गट्टूचा त्रास होत असल्याची तक्रार पर्यावरण संरक्षणासाठी ब्रिगेड म्हणजे गट्टूचा अंत्यविधीसाठी वापर सुरू करण्यात आला. मात्र या गट्टू बाबत काही तक्रारी महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या गट्टूचा रोज वापर करणारे स्मशान जोगी यांनी याबाबत मनपाला तक्रार केली आहे. गट्टू लावल्यानंतर त्याच्यापासून येणारा धूर आणि वास यामुळे त्रास होत आहे. इतकच नाही तर अंत्यविधी झाल्यानंतर प्रेत पूर्णपणे जळत नसून दोनदा ते तीनदा गट्टू चा वापर करण्याची वेळ येत आहे. परिणाम मृतदेह पूर्णपणे जळण्यास वेळ लागत आहे. अंत्यविधी करत असताना प्रेतामधून काही तुकडे हे खाली तसेच राहतात, मोठ्या प्रमाणात माती देखील त्यात मिश्रित असल्याने राख सावडताना अडचणी येत असल्याचं स्मशान जोगी यांचं म्हणणं आहे. काही नागरिकांनी स्थानिक नेत्यांकडे तक्रार केली आहे. स्मशानभूमीत असलेले शेड मर्यादित आहेत. गट्टूचा वापर करताना या शेडमध्येच अंत्यविधी करावे लागतात. एखाद दिवशी जर जास्त मृत्यू झाले तर मोकळ्या जागी अंत्यविधी करावे लागतात आणि लकडांवर करावे लागतात, गट्टू मुळे शक्य होत नाही. त्याचबरोबत प्रेत पूर्णपणे जळत नसल्याने प्रेताची अवहेलना होते, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केला आहे.
असे तयार हातात गट्टू औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास सात ते आठ ठिकाणी पंजाब रिनेबल एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत ब्रिगेड म्हणजेच गट्टू उपलब्ध करून दिले जात आहेत. ब्रिगेड्स तयार करताना शेतकऱ्याच्या शेतातील गव्हाचा भुसा, मक्याचे कणीस, कपाशीच्या फसाट्या इत्यादी साहित्याचा वापर केला जातो. हे सर्व साहित्य शेतकरी फेकून देतात अथवा जाळून नष्ट करतात. त्यामुळे सदरील साहित्य ब्रिगेड तयार करण्यासाठी वापरण्यात येते. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतोच, त्याचबरोबर प्रदूषण देखील होत नाही असा दावा कंपनीने केला आहे. तर यामध्ये ब्रिगेड वापरताना काही काळजी घ्यावी लागते. मृतदेह अंत्यविधी केल्यानंतर या गट्टूचा वापर दोनदा केला तर मृतदेह पूर्णपणे जळतो. तर दुसरीकडे व्यवस्थित जर वापर केला तर याच्यापासून कुठलाही धूर किंवा दुर्गंधी निघणार नाही, असा दावा कंपनीचे प्रतिनिधी प्रकाश झा यांनी केला आहे.
पालिका करणार पुन्हा तपासणी महापालिकेकडून देण्यात येत असलेल्या गट्टूमुळे अंत्यविधी करण्यात अडचणी येत नाही, असं म्हटलं जात होतं. पुरवठादार कंपनीने गट्टूचे याआधी चाचणी केल्यानंतरच महापालिकेला प्रस्ताव दिला असल्याचा दावा केला आहे. गट्टू वापरणे किती सुरक्षित आहे. त्यापासून कुठली हानी होणार आहे का नाही? पर्यावरणाला किती संरक्षण मिळेल. या बाबींची चाचणी केल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र गेल्या काही दिवसात येणाऱ्या तक्रारी पाहता महानगरपालिका पुन्हा एकदा सुरू असलेला प्रयोग बाबत चाचणी करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पालिकेचा निष्कर्ष आता या प्रयोगाचे भवितव्य ठरवणार आहे.