औरंगाबाद - निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. हा उत्सव आनंदाने साजरा केला जावा यासाठी साई नगर भागातील नागरिकांनी आठ दिवसांपासून तयारी केली होती. सोमवारी साई नगर येथे राहणाऱ्या नागरिकांनी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेत, सकाळी सात वाजल्यापासून 100 हून अधिक महिला पुरुषांनी फेटे घालून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा... 'आम्ही आहोत मदतीला सर्वांनी मतदान करा', वांद्र्यातील बाल मतदार मित्रांचे आवाहन
सिडको परिसरात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. या निवडणुकीत टक्केवारी वाढावी यासाठी हा उपक्रम राबण्यात आल्याचे साई नगर येथील मतदारांनी सांगितले. जवळपास एक किलोमीटर पायी मतदान केंद्रापर्यंत जात, या सर्वांनी इतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
महिला पुरुषांनी अशा प्रकारे एकत्र येऊन मतदान केल्याचे आवाहन पाहता, इतरही नागरिकांनी पुढाकार घेतला आणि मतदान केले.