ETV Bharat / city

वऱ्हाड नेणाऱ्या गाडीला वाळुज येथे अपघात, २ ठार आणि १४ जखमी

शिवराईजवळ चालक राजेंद्र नामदेव काटकर याचा ताबा सुटल्याने छोटाहत्ती सरळ काळ्यापुलाखाली २० फुट झाडात जावून अडकला.

अपघातग्रस्त वाहन १
author img

By

Published : Apr 30, 2019, 1:00 PM IST

Updated : Apr 30, 2019, 2:56 PM IST

औरंगाबाद - वाळूज येथून लग्न समारंभ आटोपून घराकडे वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटुन झालेल्या या अपघातात १ महिला आणि १ पुरुष ठार झाले तर, १४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात औरंगाबाद-अहमदनगर मार्गावरील शिवराई फाट्याजवळील काळ्यापुलावर रविवारी सायंकाळी घडला.

अपघातग्रस्त वाहन

पडेगाव, औरंगाबाद येथुन लग्न समारंभ आटोपुन वऱहाड नवाराकडे (ता. संगमनेर जि. अहमदनगर) छोटाहत्ती वाहन क्रमांक (एमएच १७ बीडी ६०६२) ने जात होता. वाळुजच्या पुढे शिवराईजवळ चालक राजेंद्र नामदेव काटकर याचा ताबा सुटल्याने छोटाहत्ती सरळ काळ्यापुलाखाली २० फुट झाडात जावून अडकला. यावेळी वाहनात १६ वऱहाडी होते. यापैकी सिताराम पांडुरंग चांगले (वय ७८) आणि शिंधुबाई भिमराज चांगले (वय ७०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, गाडीतील इतर १४ जण जखमी झाले, त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच शिवराई येथील गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना पुलाखालुन वर काढण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाळुज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शेखर राऊतवार, दत्तात्रय गरड यांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Intro:औरंगाबादच्या वाळुजजवळील काळ्यापुलावर अपघात झाला. छोटाहत्ती पुलाखाली कोसळुन 14 वऱ्हाडी जखमी, तर दोन जण ठार झाले आहेत. Body:वाळूज येथुन लग्न समारंभ आटोपून घराकडे निघालेल्या वऱ्हाडाच्या छोटाहत्ती गाडी चालकाचा ताबा सुटुन गाडी पुलाखाली कोसळुन झालेल्या अपघातात एक महीला व एक पुरुष असे दोन ठार तर 14 जण जखमी झाले. हा अपघात औरंगाबाद - अहमदनगर राज्य महामार्गावरील शिवराई फाट्या जवळील काळ्यापुलावर रविवारी सायंकाळी घडला. सर्व जखमीस वाळुज येथील 108 रुग्णवाहीका व वाळुज पोलीसांनी घाटीत उपचारार्थ दाखल केले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.Conclusion:पडेगाव, औरंगाबाद येथुन लग्न समारंभ आटोपुन नवारा ता.संगमनेर जि.नगरकडे छोटाहत्ती ( एम- एच 17 बी डी -6062) जात होता ,वाळुजच्या पुढे शिवराई जवळ चालक राजेंद्र नामदेव काटकर याचा ताबा सुटल्याने छोटाहत्ती सरळ काळ्या पुलाखाली 20 फुट झाडात जाऊन अडकला. सुदैवाने तो उलटला नाही, नसता मोठी दुर्घटना झाली असती. यावेळी छोटाहत्ती मध्ये. सिताराम पाडुरंग चांगले ,सोमनाथ सिताराम चांगले , राजेंद्र नामदेव काटसरे, शिंधुबाई भिमराज चांगले, संगिता राजेंद्र काटसरे,शिल्पा सोमनाथ चांगले, निकिता निवृत्ती, दत्ता सोमनाथ फरांडे आदींसह 16 वर्हाडी होते. हे सर्व जखमी झाले. अपघाताची माहिती मीळताच शेजारीच असलेले शिवराई येथील गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य करुन जखमीस पुलाखालुन वर काढले. जखमींना सरकारी रुगणवाहीकेचे साहाय्याने घाटीत उपचारार्थ दाखल केले असता जखमीतील सिताराम पाडुरंग चांगले (78) रा.मेंढवन ता.संगमनेर यांना डाॅक्टरांनी तपासुन मयत घोषित केले. तर शिंधुबाई भिमराज चांगले (70) या महिलेचा उपचारादरम्यान रात्री 12 वाजेच्या सुमारास म्रुत्यु झाला. अन्य जखमीवर घाटीत उपचार सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाळुज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत राठोड, पोलीस काँस्टेबल शेखर राऊतवार, दत्तात्रय गरड यांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Last Updated : Apr 30, 2019, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.