औरंगाबाद : सीआयआय यंग इंडिअन्स संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय ( Akshay Tractor Trailer Maximum at World Level ) पातळीवर घेण्यात आलेल्या ‘रुरल जुगाड स्पर्धेत’ औरंगाबाद ( Jijai Trailer and Equipment ) विभागाच्या मॅजिकच्या जिजाई ट्रेलर आणि इक्विपमेंट या स्टार्टअप्सने पहिले पारितोषिक पटकावले आहे. ग्रामीण आविष्कारांना आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत ( CII Young Indians Organization ) सामाजिक प्रभाव निर्माण करू शकेल, अशा कल्पना, उत्पादन असलेल्या स्टार्टअप्सकरिता या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विभागाने मारली बाजी : ग्रामीण भागातील विविध समस्यांचे निराकरण करणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना निवडून, नेटवर्किंगद्वारे त्यांना उप्तादन विकसित करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी सीआयआयने यंग इंडिअन्स संस्थेच्या देशपातळीवरील ५२ केंद्रांच्या माध्यमातून स्पर्धेकरिता सहभाग आमंत्रित केला होता. यामध्ये औरंगाबाद मॅजिकचे दोन स्टार्टअप्स यंग इंडिअन्स-औरंगाबाद केंद्राच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ग्रासरूट इनोव्हेशनवर काम करणारे या दोन्ही स्टार्टअप्सनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
अक्षयच्या ट्राॅलीने मारली बाजी : या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार औरंगाबाद येथील मॅजिक संस्थेत इन्क्युबेट होत असलेल्या असलेल्या अक्षय चव्हाण या नवउद्योजकाच्या ‘जिजाई ट्रेलर आणि इक्विपमेंट कंपनी’ने पटकावला आहे. अक्षय यांनी ‘सेल्फ ड्राइव्ह हेवी ड्युटी ट्रेलर’ने ट्रॅक्टर आणि ट्रोलीची क्षमता वाढणारे उत्पादन विकसित केले असून, या उत्पादनाचा मोठा फायदा शेतमाल वाहतुकीदरम्यान होणार आहे.
वाहनांमध्ये जास्त भारामुळे इंधनाचा वापर जास्त : सध्या वापरात असलेल्या वाहनांमध्ये जास्त भारामुळे इंधनाचा वापर जास्त होतो. तसेच, वाहतूक प्रक्रियेला वेळ लागतो. दुहेरी ट्रेलर वाहून नेणे असुरक्षित आहे आणि अपघाताची शक्यता वाढवतात. घाट रस्त्यावर चालवणे धोकादायक असून, जास्त भार खेचल्यामुळे देखभाल खर्च वाढतो. तसेच दुप्पट लांबीच्या आकारामुळे रस्त्यावर वाहन चालवणे नेहमीच धोक्याचे ठरते. यावर उपाय म्हणून अक्षयने स्वतः ट्रेलर विकसित केले. 12 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स आणि अतिरिक्त ब्रेक चेंबर ट्रॅक्टर हायड्रॉलिक जोडला, मोठ्या आकाराच्या ट्रोलीमुळे माल वाहन क्षमता २५ टनहून ३५-४० टन होणार आहे. तसेच वाहन क्षमतेमध्ये सुधार होऊन ट्रॅक्टरची ४०% पर्यंत इंधनाची बचत होणार आहे.
कर्ज काढून तयार केले ट्रेलर...... अतिशय साधारण घरातील असलेल्या अक्षय चव्हाण यांनी ऊस वाहतूक होत असताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला. त्यावर ट्रेलर तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्याला हा प्रकल्प राबवण्यात अडचणी आल्या. त्यात वडिलांनी देखील पैसे देण्यास नकार दिला. त्यावर त्याने आपले नातेवाईक आणि मित्र यांच्याकडून काही पैसे उभा करण्याचा प्रयत्न केला. तर काही पैसे बाजारातून व्याजाने देखील उचलले, आणि हा ट्रेलर तयार केला. आता हा ट्रेलर पूर्णतः सज्ज झाला असून लवकरच याचं पेटंट घेण्यासाठी अक्षय प्रयत्न करत आहे. तर काही सामाजिक संस्थांकडून अक्षयला मदत होईल का? याबाबत उद्योग संघटना प्रयत्नशील आहेत अशी माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ट्रेलर..... शेती उपयोगी उत्पादन विकसित करण्याचा प्रयत्न केला असून, शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतुकीसाठी येणाऱ्या समस्या याबद्दल ट्रॅक्टर आणि ट्रोली जोडणारा उत्पादन विकसित केला. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल असे मत अक्षय चव्हाण यांनी मांडले. या संपूर्ण प्रवासात मॅजिकने उत्पादन विकसित करण्यासाठी मोलाची मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले. तर ग्रामीण भागातून येणाऱ्या स्टार्टअप्सना या स्पर्धेतून मोठे व्यासपीठ मिळवण्याची, तसेच आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अस मत मॅजिकचे संचालक सुनील रायथत्ता यांनी व्यक्त केलं. सुनील रायथत्ता, रितेश मिश्रा, मिलिंद कंक, प्रसाद कोकीळ, केदार देशपांडे आणि आशिष गर्दे या मॅजिकच्या संचालक आणि यंग इंडिअन्स औरंगाबाद केंद्राच्या असीम अभ्यंकर, स्वप्नील अन्सरवाडकर, योगेश पवार यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. या यशाबद्दल मॅजिक टीमच्या वतीने अक्षय चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले.