औरंगाबाद - तृतीय पंथीय गुरूवर कारवाई करा या मागणीसाठी दहा ते पंधरा तृतीय पंथीयांनी महिला तक्रार केंद्रात ठिय्या मांडत गोंधळ घातला. यावेळी एका तृतीय पांथियाने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने एकच गोंधळ उडाला. तृतीय पंथीय गुरूवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी करत या तृतीय पंथीयांनी गोंधळ घातला होता. .
यावेळी गजरी, लाली, स्वाती, सोनी, निकिता, सोनाली, जोया यांच्यासह वीस ते पंचवीस तृतीय पंथीय यांनी महिला तक्रार केंद्रात ठिय्या मांडला होता.दरम्यान या गुरुवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी या तृतीयपंथीय शिष्यांनी केली. दरम्यान या प्रकरणांमध्ये महिला तक्रार निवारण केंद्र (Women's Complaints Center ) व दामिनी पथकाच्या महिला पोलिसांनी हस्तक्षेप करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण मिटविण्यात आले.