औरंगाबाद - काळ्या बुरशीच्या म्हणजेच म्युकरमायकोसिस या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येणार आहे. अशी माहिती सरकारच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात देण्यात आली.
म्युकरमायकोसिस उपचार बाबत न्यायालयाने केली होती विचारणा..
म्युकरमायकोसिस आजारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार का दिली जात नाहीत, या आजारावर उपचार करण्यासाठी योजनेतून फक्त दीड लाख रुपये दिले जातात. मात्र उपचारासाठी लागणारा खर्च त्याहून अधिक आहे. त्यामुळे या योजनांमध्ये पूर्ण उपचार का दिली जात नाहीत? असा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केला होता. त्यावर राज्य सरकारने आपलं म्हणणं मांडलं आहे. या योजनेचा खर्च मर्यादा दीड लाखांपर्यंत असली, तरी महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील पात्र ठरला धरला जाईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात देण्यात आली. मागील सुनावणीत न्या. रवींद्र घुगे व न्यायमूर्ती बी. यु. देबडवार यांनी याबाबत प्रशासनाला आपले म्हणणे मागवले होते.
एका पोर्टलवर मिळेल माहिती..
राज्यात 18 हजार अन्फोटेरिसीन बी इंजेक्शन उपलब्ध आहेत. 1 हजार रुग्णालय या योजनेला जोडली जातील. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी नव्या उपचार पद्धतीची रचना केली जात आहे. राज्य सरकारने एक पोर्टलद्वारे दररोज उपचार संबंधी आणि खाटासंबंधी माहिती उपलब्ध करावी, अशी सूचना औरंगाबाद खंडपीठाने दिल्या.