ETV Bharat / city

जलयुक्त शिवार योजनेमुळेच मराठवाड्यात जलप्रलय, अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांचा आरोप

मागील काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही स्थिती जलयुक्त शिवार योजनेमुळे झाल्याचा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांनी केला आहे.

economist H. M. Desarda
economist H. M. Desarda
author img

By

Published : Oct 5, 2021, 4:43 PM IST

औरंगाबाद - मागील काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही स्थिती जलयुक्त शिवार योजनेमुळे झाल्याचा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांनी केला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

अति खोदकामामुळे जलप्रलय -

युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. मात्र ही काम करत असताना नसर्गिक प्रवाह नष्ट करण्यात आले. पोकलेन, जेसीबी लावून गेल्या अनेक वर्षांपासून तयार झालेला नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट करण्यात आला. कुठे अति खोल तर कुठे रुंद खोदकाम झाल्याने शेतीचे नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह अडवताना शास्त्रशुद्धपणा न वापरल्याने पाण्याचा प्रलय झाला असा आरोप एच. एम. देसरडा यांनी केला.

जलयुक्त शिवार योजनेवर अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांचा आरोप
जलसंधारणाची कामे चुकीच्या पद्धतीने केली -

युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना राबवणार असे सांगत असताना योजना जलसंधारणाची असली तरी ती चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. असा इशारा त्यावेळी दिल्याचे देसरडा यांनी सांगितले. एकाच गावात अनेक बंधारे बांधून चुकीच्या पद्धतीने पाणी अडवण्याचे काम केले जात आहे. पाणी अडवल्याने जमीन वाहून गेली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. किती जमीन वाहून गेली याचं गणित मांडणे अवघड आहे. मात्र योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्याने आज मराठवाड्यात महाप्रलय आल्याचे अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांनी सांगितले.

हे ही वाचा - यवतमाळ : नाल्याच्या पुरात 60 ते 70 गाई गेल्या वाहून

भाजप नेत्यांनी फेटाळले आरोप -

जलयुक्त शिवार योजनेत कुठलेही चुकीचे काम झाले नसल्याचे स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. काम करत असताना तांत्रिक बाबी तपासून काम केले आहे. नदीचा किंवा तलावाचा प्रवाह बदलला नाही. त्यामुळे कोणी आरोप करत असेल तर ते चुकीचे आहे.असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले.

हे ही वाचा -राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; पुण्यात दीड तास धुव्वाधार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.