ETV Bharat / city

Tehsildar Suicide : साताऱ्यात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या - महसूलमंत्री अब्दुल सत्तार

महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण बोराटे यांना गेल्या काही दिवसापासून वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्रास देण्यात येत होता. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या बोराटे यांनी शनिवारी रात्री उशिरा छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने बांधून गळफास घेतला.

तलाठ्याची आत्महत्या
author img

By

Published : Nov 29, 2021, 7:18 PM IST

औरंगाबाद - वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून ४१ वर्षीय तलाठ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. लक्ष्मण नामदेव बोराटे (वय ४१,रा.सातारा ) असे आत्महत्या करणार्‍या तलाठ्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

तलाण्याच्या पत्नीची प्रतिक्रीया

महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण बोराटे यांना गेल्या काही दिवसापासून वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्रास देण्यात येत होता. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या बोराटे यांनी शनिवारी रात्री उशिरा छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने बांधून गळफास घेतला. रविवारी सकाळी बोराटे लवकर न उठल्यामुळे यांच्या आईने बोराटे यांच्या आतेभावाला त्यांना उठविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी बोराटे यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर बोराटे यांच्या आईने व नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बोराटे यांच्या घराचा दरवाजा तोडला. तेव्हा बोराटे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ फासावरून खाली उतरवून उपचारासाठी घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
लक्ष्मण बोराटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यता घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यावर नातेवाईकांनी सायंकाळी उशिरा बोराटे यांचा मृतदेह ताब्यात घेवून अंत्यविधी केला.

माजी सरपंचांना व्हॉटसअप मेसेज
साताऱ्याचे माजी सरपंच फेरोज पटेल यांच्या बोराटे हे नेहमी संपर्कात होते. त्यांना आपला कशाप्रकारे छळ होत आहे याची कल्पना दिली होती. त्यामुळे पटेल यांनी संजय गांधी निराधार योजना विभागातून त्यांची बदली करण्यासाठी महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे शिफारस केली होती. सत्तार यांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना बोराटे यांच्या बदलीविषयी सांगितले होते. त्यामुळे त्यांची संजय गांधी निराधार योजनेच्या विभागातून आवक-जावक विभागात दहा ते पंधरा दिवसांपुर्वी बदली करण्यात आली होती. मात्र, तेथे देखील पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे बोराटे त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी रात्री पटेल यांना व्हॉटसअप मेसेज केला होता.

हेही वाचा - Mobile App Fraud Case : मोबाइल ॲपच्या माध्यमातून व्यावसायिकाची फसवणूक; कर्जाचे दिले आमिष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.