गंगापूर(औरंगाबाद) - नाशिक येथे एका व्यक्तीने कोरोनाची लस घेतल्यानंतर नाणी व स्टेनलेस स्टीलच्या वस्तू अंगाला चिकटत असल्याची घटना घडली. असे असतानाच औरंगाबादेमध्येही गंगापुरातील ममदापूर येथील 47 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला लस घेतल्यानंतर नाणे स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकरी दत्तात्रे ताके यांनी स्वत: नाणी व स्टेनलेस स्टीलच्या वस्तू अंगाला चिकटवून याचा अनुभव घेतला असून अंगाला आलेल्या घामामुळे वस्तू अंगाला चिकटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंगाला आलेल्या घामामुळे वस्तू चिकटत असल्याचा दावा
लस घेतल्यानंतर अंगाला वस्तू चिकटत असल्याचा प्रयोग दत्तात्रे ताके यांनी करून पाहिला आहे. वस्तू अंगाला चिकटत असल्याने ते गोंधळून गेले. मात्र कुठलाही त्रास त्यांना होत नाही. अंगावर आलेल्या घामामुळे नाणी व स्टेनलेस स्टीलच्या छोट्या वस्तू अंगाला चिकटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
'हा प्रकार लसीमुळे नाही तर अंगाला आलेल्या घामाने असे होतेय'
18 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या गावातील लसीकरणाच्या कॅम्पमध्ये कोरोनाची लस घेतली. नाशिक येथील एका व्यक्तीच्या अंगाला कोरोनाची लस घेतल्यानंतर नाणी व स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याची बातमी प्रसार माध्यमात पाहिली त्यांनी हा प्रयोग सहजच स्वतःवर करून पाहिला. चलनातील नाणी व स्टेनलेस स्टीलच्या वस्तू अंगावर चिकटत होत्या. कोरोना लसीमुळे नाही तर अंगाला आलेल्या घामाने असे होत आहे, कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेतल्यावर कुठलाही त्रास त्यांना झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत रस्त्यावरील भांडण सोडवणे पडले महाग, तिघांचा मृत्यू तर तिघे जखमी