औरंगाबाद - तब्बल पंधरा दिवसांनंतर शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पैठण एसटी आगारतून पहिली बस पोलीस बंदोबस्त बाहेर पडली. पैठण - पाचोड मार्गावर महामंडळाची ही 'लालपरी' बस धावली. मात्र, पोलीस बंदोबस्तात परत येताना आंदोलन कर्त्यांनी या बसवर जबर दगडफेक (Stones thrown at msrtc bus) करून बसचे नुकसान केले. याबाबत अगर प्रमुखांच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांवर पैठण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - ajanta road अजिंठा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण, खर्चही वाढला; पर्यटकांचे होत आहेत हाल
एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असताना दुसरीकडे पैठण आगारातील दोन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत कामावर परतण्याचे धाडस दाखविल्याने प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे होती. संध्याकाळच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात एसटी महामंडळाची बस पैठण पाचोड आणि पाचोड येथून परत, अशी फेरी मारणार होती. मात्र, पाचोडहून परत येताना रहाटगाव जवळ बसवर पोलीस बंदोबस्त असूनही दगडफेक झाली आणि दगडफेक करणारी लोक अंधारात पसार झाली. आणखी काही कर्मचारी कामावर परतणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी माध्यमांना सांगितले. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीत अवश्यक बंदोबस्त दिला जाणार आहे.
मात्र, या घटनेमुळे कर्मचारी धास्तावल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - Chikalthana Covid Center : इन्शुरन्सच्या पैशांसाठी दाखल केले कोविडचे बोगस रुग्ण? पोलिसांचा प्राथमिक अंदाज