औरंगाबाद - मागील दोन दिवसांमध्ये केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असून (Increasing Corona Patients) नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेऊन सतर्क रहावं अस मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केलं.
नियमांबाबत राज्याने घ्यावे निर्णय
प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. केरळ आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात रुग्ण हे वाढत आहे. त्यामुळे आता राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला हवे. लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे असून काही ठिकाणी 80 टक्के तर काही ठिकाणी 100 टक्के देखील लसीकरण झाले आहे. केंद्र यापुढे लॉकडाऊन बाबत निर्णय घेणार नसून, हा निर्णय राज्यांनी त्यांच्या भागात घ्यायचा आहे. यामध्ये रात्रीची संचारबंदी लावणे किंवा इतर निर्बंध असतील ते राज्यांनी स्वतःच्या अधिकारातील परिस्थिती बघून घ्यावेत अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णवाढ सुरूच, 5631 नव्या रुग्णांची नोंद