औरंगाबाद - भारतीय चलनातील बनावट नोटांची छपाई करून, बाजारात आणणाऱ्या रॅकेटचा औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने भांडाफोड केला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली ( Fake currency printing racket exposed ) आहे. त्यांच्या तब्यातून बनावट नोटा, प्रिंटर, मोबाईल असा सुमारे दीड लखाचा ऐवज पोलिसांनी जप्त ( accused arrested Fake currency printing racket )आहे. हनुमंत नवपुते, किरण कोळगे, चरण शिहरे, प्रेम शिहरे, संतोष शिरसाठ, हारुणखान पठाण, अंबादास ससाणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे, तर त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
१०० रुपयांच्या छापत होते नोटा - आर्थिक चलनातील १०० रुपये किमतीच्या बनावट छापून नंतर एजंटमार्फत बाजारात आणल्या जात ( Fake currency racket in Aurangabad ) आहे. या टोळीतील आरोपी शहरात येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हेशाखेच्या पथकाने शिवाजीनगर भागात सापळा रचला. मिळालेल्या माहितीप्रमाणे असलेले वर्णन आणि दुचाकी क्रमंकावरून पथकाने आरोपींना तब्यात घेत त्यांची झाडती घेतली. आरोपीकडे २५ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.
पोलिसांनी केली कारवाई - बनावट नोटांसह पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ( racket exposed in Aurangabad ) आहे. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी या टोळीने शहरासह कुठे - कुठे बनावट नोटा आणल्या. रॅकेटमध्ये अजून किती साथीदार आहे ? याचा शोध पोलीस घेत असून राज्यस्तरीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.