औरंगाबाद - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( Nationalist Youth Congress ) वतीने एक ऑफर देण्यात आली आहे. ज्यामधे एक लाख रुपये जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा ( Show ED action against BJP leaders ) आणि लाख रुपये बक्षीस मिळवा अशी, ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अक्षय पाटील ( Akshay Patil of Nationalist Youth Congress ) यांनी ही योजना काढली असून लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर - भाजपकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना इडीच्या माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे असा आरोप शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येत आहे. ज्यांच्यावर आरोप केले जातात, ती मंडळी भाजपात आली की कारवाई थांबत आहे. केवळ विरोधी पक्षांनाच लक्ष केले जात असल्याने 'भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा', अशी ऑफर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - Sanjay Raut ED Custody : संजय राऊतांचा मुक्काम ईडी कोठडीत; मिळणार घरचे जेवण
शहरात बॅनरबाजी - या ऑफर बाबत शहरात लावलेल्या अनोख्या पोस्टरने लक्ष वेधले आहे. केंद्रामध्ये ऐतिहासिक बहुमताने भाजपचे सरकार ( BJP Govt ) सत्तेत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये आज भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. तरी एवढ्यावरच भाजपची सत्तेची भूक भागत नसल्यामुळेच विरोधी पक्षांचे सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून पाडली जात आहेत. एवढ्यावर पण भाजप थांबायला तयार नाही. विरोधी पक्षाच्या प्रमुख ज्येष्ठनेत्या सोनिया गांधी, कॅन्सर सारख्या आजाराशी लढत असताना त्यांच्यासह राहुल गांधी यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले. इतर राज्यातील विरोधी पक्षांचे नेते यांच्यावरच केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून आरोप करत कारवाई केल्या जात आहेत. ती मंडळी भाजपमध्ये गेली की चारित्र्यवान केले जात आहेत. त्यामुळे अनोखी ऑफर दिल्याचं अक्षय पाटील यांनी सांगितलं.
माहिती देण्याचं आवाहन - जनतेला माझे खुले आव्हान आहे, की भाजप नेत्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कार्यवाही झाल्याचे,
भाजपात गेलेल्यांची कार्यवाही पुढे चालूच ठेवल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा, असे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर सुरू असलेली कारवाई बंद झाली की त्या चालूच आहेत. याची माहिती कळेल म्हणून ही ऑफर दिली असून शहरात तसे फलक लाऊन भाजपचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं अक्षय पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा - Sanjay Raut to ED Custody : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; वाचा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद