औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गर्दी करून नका आणि कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांकडूनच मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.
औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांचे वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत, कोरोना नियमांची पायमल्ली! - nandkumar ghodele
औरंगाबादेत शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.
औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांचे वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत, कोरोना नियमांची पायमल्ली!
औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गर्दी करून नका आणि कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांकडूनच मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.
औरंगाबादचे माजी महापौर ननंदकुमार घोडले यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आलं. वाढदिवस साजरा करत असताना कार्यकर्त्यांनी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडविल्याचे चित्र बघायला मिळाले. कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनसाठी ढोल-ताशे आणि फटाक्यांची आतषबाजीही केली. थाटामाटात वाढदिवस साजरा केला. त्यामुळे घोडेले यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
याआधी आमदार संजय शिरसाठ यांच्यावर झाला गुन्हा दाखल
कोविड काळात पाण्याच्या पाईपलाईनचे उदघाटन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. संचारबंदी काळात उद्घाटन केल्याने शिरसाठ यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्यापूर्वी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकेच्या निवडणुकीत असेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवत निवडणूक जिंकल्याचा आनंद साजरा केला होता. त्यामुळे लोकांना नियम पाळण्याचे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांना पक्षातील नेत्यांकडूनच केराची टोपली दाखविली जात असल्याचे बोलले जात आहे.

Last Updated : May 7, 2021, 7:25 AM IST