औरंगाबाद : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचा सत्र सुरू ठेवले आहे. महविकास आघाडी सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा घेतलेला निर्णय रद्द केल्याने औरंगाबाद येथे टीव्ही सेंटर भागात शिवसेनेने आंदोलन( Shiv Sena staged a protest in Aurangabad ) केले. ठाकरे सरकारने निर्णय घेतला, त्यावेळी दहा मंत्री तरी होते. आता दोन मंत्र्यांनीच कसा निर्णय घेतला, असा प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. ( Shiv Sena leader Chandrakant Khaire )
एक महिन्यात केंद्र सरकारकडून मंजुरी आणा : गद्दारी करून सत्तेत आल्यावर लगेच सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचे काम केले जात आहे. हे सरकार संभाजी महाराजांना विरोध करणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले नाव आहे. त्याला विरोध कशाला करताहेत. महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला त्यावेळी मंत्र्यांची संख्या जास्त होती. आता तर दोघेच जण आहेत. हे कसे चालते? त्यावेळी सरकारने घेतला निर्णय योग्यच होता. आता एक महिन्यात केंद्राकडून नावाला मंजुरी आणावी, अन्यथा आम्ही यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.
आमदार शिरसाठ यांच्या समर्थकांची हकालपट्टी : पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाठ यांना पाठिंबा दिल्याचे कारण देत युवासेनेचे पदाधिकारी राजेंद्र जंजाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्ष विरोधी कारवाई केल्याने आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाला नव्याने उभे करू, असे मत चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
हेही वाचा : Monsoon Session of Parliament : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक