औरंगाबाद - वैजापूरचे सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना जाब विचारला आहे. शनिवारी खैरे यांच्यासोबत झालेले संभाषण व्हायरल केल्याबाबत हा जाब विचारत आता तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये असलेले वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे ( MLA Ramesh Bornare ) यांनी शनिवारी थेट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांना फोन करून बंडखोर आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मध्यस्थी घडवून आणण्याची विनंती केली. यावर खैरे यांनीही तुम्ही या, मी मध्यस्ती करतो. तुमची उद्धव साहेबांशी भेट घडवून आणतो, असे उत्तर दिले. हे संभाषण समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे बोरनारे संतप्त झाले आहेत.
बोरनारे यांना खैरे यांनी सुनावले : शनिवारी झालेले संभाषण व्हायरल झाल्यावर आमदार रमेश बोरनारे यांनी रविवारी पुन्हा फोन करत, तुम्ही संभाषण व्हायरल केले. तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा जाब विचारला. त्यावर सेना नेते चंद्रकांत खैरे संतप्त झाले. मी तुमच्या कार्यकर्त्यांना फोन केल्यावर ती ऑडिओ क्लिप कशी व्हायरल केली. तुम्हाला यायच असेल तर या, तिकडे तुमच भल नाही. माझ्याकडे या नाहीतर अन्य कोणाकडे जा, मात्र मातोश्रीवर जा आणि सोबत रहा. अन्यथा काय होईल सांगता येत नाही, असे खाडेबोल खैरे यांनी बोरनारे यांना सुनावले. त्यामुळे आता जिल्ह्यातील सेनेतील अंतर्गत वाद रंगणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - Prakash Abitkar : गुवाहाटीमध्ये दोन आमदार एकमेकांमध्ये भिडले?, प्रकाश आबिटकर म्हणाले, या गोष्टी...