ETV Bharat / city

औरंगाबादेत सातवीतील विद्यार्थिनीला शिक्षकानेच दाखवले पॉर्न व्हिडिओ; गुन्हा दाखल - सिडको पोलीस स्टेशन

शिक्षकानेच सातवीच्या विद्यार्थिनीला पॉर्न व्हिडिओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरातील एका शाळेत तीन आठवड्यांपूर्वी घडला होता.

sidco police station
सिडको पोलीस स्टेशन
author img

By

Published : Feb 4, 2020, 6:21 PM IST

Updated : Feb 4, 2020, 6:53 PM IST

औरंगाबाद - शिक्षकानेच सातवीच्या विद्यार्थिनीला पॉर्न व्हिडिओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरातील एका शाळेत तीन आठवड्यांपूर्वी घडला होता. त्या मुलीने याची माहिती पालकांना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षकाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त

हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'

सिडको भागातील एका शाळेमध्ये सातवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकानेच मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवला आहे. ही घटना सुमारे तीन ते चार आठवड्यापूर्वीची आहे. मुलीच्या वागण्यात बदल आल्याने पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार मुलीने पालकांना सांगितला. त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे याबाबत तीन दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली होती.

आज (मंगळवार) पालकांनी त्या शिक्षकाचे निलंबन करण्यात यावे, यासाठी शाळेत धाव घेतली होती. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सिडको पोलीस ठाणे गाठले होते. या प्रकरणी दुपारी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना घडून सुमारे तीन ते चार आठवडे झाले आहेत. पालकांनी घडलेला प्रकार शाळा प्रशासनाला सांगितला होता. त्यानंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता सातवीतील वर्गातून काढून संबंधित शिक्षकाला पहिली ते दुसरीच्या वर्गात वर्ग केले. यावरून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले.

Intro:शिक्षकानेच सातवीच्या विद्यार्थिनींना पॉर्न विडिओ दाखवून लगट केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरातील एका शाळेत तीन आठवड्यापूर्वी घडला.विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्या नंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी शिक्षकाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Body:सिडको भागातील एका शाळेमध्ये सातवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षकानेच मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडीओ दाखवला आहे.
ही घटना सुमारे तीन ते चार आठवढ्यापुर्वीची आहे. मुलींच्या वागण्यात बदल आल्याने पालकांनी विश्वास घेऊन विचारल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्या नंतर पोलीस आयुक्तकडे या बाबत तीन दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली होती.

आज पालकांनी त्या शिक्षकांचे निलंबन करण्यात यावे यासाठी शाळेत धाव घेतली होती. सर्व पालकांनी शाळेच्या मुख्यधपकला घेऊन सिडको पोलीस ठाणे गाठले होते.या प्रकरणी दुपारी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना घडून सुमारे तीन ते चार आठवडे होत आहे.पालकांनी घडलेला प्रकार शाळा प्रशासनाला सांगितला होता.त्या नंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होणे गरजेचे होते.मात्र तसे न करता 7 वि वर्गातून काढून संबंधित शिक्षकाला 1ली ते 5वि वर्गात वर्ग केले. या वरून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षकावर कारवाई करणायचे आश्वासन पालकांना दिले..

बाईट- डॉ.नागनाथ कोडे, साह्ययक पोलीस आयुक्तConclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.