औरंगाबाद - एकीकडे इंग्रजी शाळांचा दबदबा वाढत असताना मनपा शाळांनी ( Response to municipal schools ) आपले वेगळे वर्चस्व निर्माण केले आहे. यावर्षी सुरू करण्यात आलेल्या तीन नवीन शाळांमध्ये क्षमतेच्या तीनपट अधिक नोंदणी ( MNC New School ) करण्यात आली आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया राबवण्याची वेळ मनपावर ( implement selection process Municipal Corporation) आली आहे.
दोनशे जागांसाठी सहाशे अर्ज - औरंगाबाद महानगर पालिकांनी यंदा शिक्षण प्रणाली चांगली असावी यासाठी तीन सी.बी.एस.सी शाळा ( CBSC school started ) सुरू केल्या आहेत. प्रियदरनी इंदिरा नगर, चेलिपुरा हायस्कुल या ठिकाणी नवीन शाळा सुरू करण्यात आल्या. तीन नवीन शाळांमध्ये 200 विद्यार्थांना दाखला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी पालकांना अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यासाठी दोन दिवस दिलेल्या मुदतीत 200 जागांसाठी पहिल्या दिवशी 390 अर्ज तर, दुसऱ्या दिवशी 210 च्या जवळपास अर्ज प्राप्त झाले. त्यातून आता निवड प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मनपाचे संस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी दिली.
पहिल्या दिवशी मनपाने केले जंगी स्वागत - दोन वर्षानंतर कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा नियमित सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्यादिवशी मनपातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तुतारी वाजवून ढोल तश्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. तसेच मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांच्या हस्ते मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा - Strawberry Moon Photos : स्ट्रॉबेरी सुपरमूनचे जगातील विविध ठिकाणचे आकर्षक फोटोस
हेही वाचा - OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक