औरंगाबाद - चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) आता संपलेले आहेत. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोला अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे ( District Guardian Minister Sandipan Bhumre ) यांनी केली आहे. आम्ही शिवसेनेचे, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आमचे प्रमुख आहेतच अस वक्तव्य संदीपान भूमरे यांनी करत आम्हीच शिवसेना आहोत अस टीकास्त्र सोडलं.
खैरे यांना महत्त्व नाही ....चंद्रकांत खैरे काय बोलतात याला महत्त्व नाही. रोज रोज तेच ते, लोक आता त्यांना कंटाळलेले आहेत. त्यांना काही काम नाही. खैरे हा विषय आता संपलेला आहे. खैरेंचे नाव घेण पण आता उचित नाही. खैरेंनी शहराचे वाटोळे करून टाकले. त्यांना लोकांनी नाकारलं आहे. आता शहराचा, जिल्ह्याचा विकासावर आपण बोलायला हवे. एकनाथ शिंदे आमचे प्रमूखच आहेत आम्ही त्यांना प्रमुखच मानतो असेही संदिपान भुमरे म्हणाले.
मेळावा ढोंगी पणाचा नव्हता ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सुरू असताना बहुतांश लोक उठून गेले गेले असता यावर बोलताना मंत्री संदीपान भूमरे म्हणाले की आम्ही ढोंगीपणा केला असता तर, येवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक जमले नसते. एकनाथ शिंदे यांच्या सभेला आलेली गर्दी पाहता इतिहासात ऐतिहासिक सभा झाली असे भूमरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांचे सभेतून कोणीही उठून गेले नाही असे ठामपणे सांगत, थोडे फार आत बाहेर येणे चालू होते, उठूनच जायचं होते तर लोक आलेच कशाला असते? ते ऐकायला आले होते असे भूमरे म्हणाले.