ETV Bharat / city

National Women Chess Championship: राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीला उपविजेतेपद

४७ वी राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा भुवनेश्वर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण १०३ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी औरंगाबादची साक्षी चितलांगे हिने उपविजेतेपद पटकावले.

author img

By

Published : Mar 13, 2022, 3:50 PM IST

Updated : Mar 13, 2022, 5:31 PM IST

sakshi chitlange
sakshi chitlange

औरंगाबाद : भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या ४७ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त औरंगाबादची साक्षी चितलांगेने उपविजेतेपद पटकावले. उपविजेते पदासह साक्षीने वूमन अँडमास्टरचा तिसरा नॉर्म देखील प्राप्त केला आहे. यासोबतच साक्षीचे ग्रैंडमास्टर टायटलसाठी तिन्ही नॉर्म पूर्ण झाले आहेत.

साक्षी चितलांगेशी केलेली बातचीत
४७ वी राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा भुवनेश्वर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण १०३ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी औरंगाबादची साक्षी चितलांगे हिने देखील सहभाग नोंदविला होता. साक्षीने स्पर्धेच्या सुरुवातीला वूमन ग्रँडमास्टर नंदिता पिवी, मेरी गोम्स यांना पराभूत करीत व इंटरनॅशनल मास्टर स्वामिनाथन सोबत बरोबरी साधली. साक्षी पाचव्या फेरी अखेरीस साडेचार गुणांसह पहिल्या स्थानावर पोहचली होती. मात्र, सहाव्या फेरीत तिला दिव्या देशमुखकडून पराभव पत्करावा लागला. साक्षीने आठव्या फेरीत नॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णीला लंडन ओपनिंगमध्ये सुरू झालेल्या खेळीत राजावर जोरदार हल्ला करीत सहज पराभूत केले. अखेरच्या फेरीत वूमन सौम्या इंटरनॅशनल मास्टर अर्पिता मुखर्जीला नमवत तिने उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.
९ आंतरराष्ट्रीय,चौदावे राष्ट्रीय पदक
औरंगाबादच्या साक्षी चितलांगेने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये स्वतःचा ठसा उमटविला आहे. तिने आतापर्यंत देशासाठी ९ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. भुवनेश्वर येथील नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत तिचे चौदावे राष्ट्रीय पदक आहे.साक्षीचे आंतरराष्ट्रीय रेटिंग ५७ ने वाढले. तिला वूमन ग्रैंडमास्टर टायटलसाठी २३०० रेटिंगचा टप्पा पार करावा लागणार आहे.
प्रोफेशनल कोचविना मिळवली पदक

बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बहुतांश खेळाडू हे स्वतःचा एक प्रोफेशनल कोचची निवड करत असतात. यासाठी लाखो रुपये मोजले जातात. मात्र, साक्षी चीतलांगे हिने आतापर्यंत एकही प्रोफेशन कोच नाही. स्पर्धेसाठी साक्षी स्वतःच तयारी करते.तर यासाठी तिचे वडील तिला मार्गदर्शन करतात.
वूमन ग्रँडमास्टरसाठी २२६२ रेटिंगची आवश्यकता
साक्षीला वूमन ग्रँडमास्टरचा किताब पटकावण्यासाठी अद्याप २२६२ रेटिंगची आवश्यकता आहे. साक्षीने या आधी पहिला नॉर्म २०१९ मध्ये आशियाई ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत प्राप्त केला. दुसरा नॉर्म स्पेन येथे २०२१ मध्ये मिळवला होता.

हेही वाचा - German Open : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टर ऍक्सेलसनचा पराभव करत लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक

Last Updated : Mar 13, 2022, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.