ETV Bharat / city

Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला

दरवर्षी पैठण ते पंढरपूर असा 18 ते 19 दिवस वारीच्या माध्यमातून प्रवास करत नाथांची पालखी पंढरपूरला दाखल होते. मात्र कोरोनामुळे वारीला परवानगी नसल्याने यंदा पालखी येत्या अठरा दिवसांसाठी गावाबाहेरील मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा गावाबाहेरील नाथ मंदिरात पालखीचे आगमन होईल अशी माहिती राहुनाथ बुआ गोसावी पालखीवाले यांनी दिली.

Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला
Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला
author img

By

Published : Jul 1, 2021, 3:55 PM IST

Updated : Jul 1, 2021, 4:37 PM IST

पैठण (औरंगाबाद) : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पैठणमधील नाथ मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रथेनुसार प्रस्थान झाले आहे. मात्र कोरोनामुळे वारीला परवानगी नसल्याने ही पालखी पुढील अठरा दिवस गावाबाहेरील मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. (Saint eknath palakhi departs from paithan, will go to pandharpur on 19th july by bus)

Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला

पादुका यावर्षीही जाणार बसने
दरवर्षी पैठण ते पंढरपूर असा 18 ते 19 दिवस वारीच्या माध्यमातून प्रवास करत नाथांची पालखी पंढरपूरला दाखल होते. वाटेत भजन-कीर्तन करत मोठया भक्तिभावाने मुखी पांडुरंगाचे नाव घेत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र कोरोनाचा प्रदूर्भाव लक्षात घेता, मागील वर्षी वारी रद्द करण्यात आली होती. एसटी बसने नाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे रवाना झाल्या होत्या. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वारीला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे 19 जुलै रोजी पालखी एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करेल. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा गावाबाहेरील नाथ मंदिरात पालखीचे आगमन होईल अशी माहिती राहुनाथ बुआ गोसावी पालखीवाले यांनी दिली.

भानुदास-एकनाथच्या गजराने पैठण नगरी दुमदुमली
एक जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास प्रथेप्रमाणे नाथ महाराजांच्या पालखीचे गावातील मंदिरातून प्रस्थान झाले. दरवर्षी असतो तसाच सोहळा पालखी प्रस्थानाच्या वेळी रंगला होता. भानुदास-एकनाथच्या गजरात परिसर दुमदुमला होता. टाळ-मृदुंगाच्या गजरात पैठण नगरी नाथमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गावातील मंदिर ते बाहेरील नाथ मंदिर हा प्रवास वारकऱ्यांनी नाथांच्या पालखीसोबत केला. रस्त्याने गावकऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. मंदिरात पालखी पोहोचताच मंदिरात विठ्ठलाचा जयघोष सुरू झाला. भजन-किर्तनानाने पैठण नगरी भक्तीमय झाली. आता 19 जुलैपर्यंत ही पालखी गावाबाहेरच्या मंदिरात सर्वसामान्यांना दर्शन घेता यावे म्हणून ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात; परवानगी असलेल्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश

Last Updated : Jul 1, 2021, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.