औरंगाबाद - शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रियल कॉरिडोरला लागलेले ग्रहण अद्याप सुटायला तयार नाही. बिडकीन येथे औद्योगिक वसाहत पाहण्यासाठी आलेल्या चिनी उद्योगाचे पथक रस्त्यांची दुरवस्था bad condition of Bidkin Road पाहून जागा न पाहताच माघारी परतल्याची प्राथमिक माहिती समोर आली Representative of Chinese companies returned आहे. त्यामुळे प्रशासकीय अनास्था पुन्हा एकदा कारणीभूत ठरल्याचा बोलले जात आहे.
शेंद्रा ,बिडकीन औद्योगिक वसाहत दिल्ली मुंबई मध्ये असलेल्या सात प्रमुख नोडलपैकी एक आहे. दहा हजार एकरवर औद्योगिक आणि रहिवासी अशी दुहेरी व्यवस्था असलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाची सकारात्मक बाजू म्हणजे धुळे महामार्ग, समृद्धी महामार्ग, रेल्वे सुविधा, विमानतळ अशा सर्व गोष्टी जवळ असणे होय. उद्योग उभारणीसाठी सर्व सोयीसुविधा असलेला हा प्रकल्प आहे. देशातील सर्वाधिक अत्याधुनिक प्रकल्प मानला जातो. जेथे उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्रकल्प जात आहेत परत औरंगाबाद येथील अत्याधुनिक औद्योगिक वसाहत पाहण्यासाठी अनेक देशातून कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करण्यासाठी येतात. मात्र पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक प्रकल्प उभारण्यास नकार देतात. त्यातच चीन मधून औषधी कंपन्यांचे आलेले प्रतिनिधी रस्ता पाहूनच परत गेल्याची माहिती समोर आली आहे. शेंद्रा येथे मोठ्या उद्योजकांनी पसंती दाखवली आहे. मात्र त्याचाच एक भागात असलेल्या बिडकीन येथे मात्र अद्याप उद्योग यायला तयार नाहीत. औरंगाबादहुन बिडकीन साधारणतः 24 ते 25 किलोमीटरचा अंतर आहे. मात्र हे अंतर कापत असताना रस्त्याची दुरावस्था पाहता उद्योजक त्या बाजूस आपले प्रकल्प उभारण्यास तयार नाहीत. औरंगाबाद पैठण रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार, अशी घोषणा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र या अद्याप घोषणाअसून प्रत्यक्षात रस्त्याचे दुरवस्था असल्याने प्रकल्प सुरू करण्यात अनेक अडचणी येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं. Representative of Chinese companies returned after Seeing the bad condition of Bidkin Road