औरंगाबाद - भोकरदन तालुक्यातील चिंचोली शिवार येथे दि. ४ ऑक्टोबरला शेतात बकरी चारण्यासाठी आणली म्हणून तरुणाशी वाद घालत त्याला मारहाण करण्यात आली होती. त्याला जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्या तरुणाचा मृत्यू झाला. रामदास कडूबा जोशी (वय -38, रा. चिंचोली शिवार ता. भोकरदन जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी घाटी गाठत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत, घाटीत ठिय्या मांडला.
बकरी चरताना वाद : जखमी तरुणाच्या मृत्यूने घाटीत नातेवाईकांचा ठिय्या - घाटी रुग्णालयात जखमी तरुणाचा मृत्यू बातमी
आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देऊन, जोशी परिवाराला ५० लाखाची मदत सरकारने करावी. तसेच जोशी परिवारातील एक सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. त्यानंतर धनगर समाजाचे शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन दिले. दुपारी उशिरापर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
बकरी चरताना वाद : जखमी तरुणाच्या मृत्यूने घाटीत नातेवाईकांचा ठिय्या
औरंगाबाद - भोकरदन तालुक्यातील चिंचोली शिवार येथे दि. ४ ऑक्टोबरला शेतात बकरी चारण्यासाठी आणली म्हणून तरुणाशी वाद घालत त्याला मारहाण करण्यात आली होती. त्याला जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्या तरुणाचा मृत्यू झाला. रामदास कडूबा जोशी (वय -38, रा. चिंचोली शिवार ता. भोकरदन जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी घाटी गाठत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत, घाटीत ठिय्या मांडला.
Last Updated : Oct 8, 2020, 4:17 PM IST