औरंगाबाद - एक जवळचा माणूस दुसऱ्या माणसाच्या घराबाहेर बॉम्ब कसा ठेऊ शकतो अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Sachin Waze) यांनी औरंगाबादेत केली. सचिन वाझे (Sachin Waze) 6 महिने तुरुंगात होते. आणि बडतर्फ होते. नंतर ते शिवसेनेत आल्यावर कार्याध्यक्षांच्या जवळचे होते. मुकेश अंबानीसुद्धा (Raj Thackeray on Mukesh Ambani) कार्याध्यक्ष यांच्या जवळचा आहे. तरीही तो जवळच्या माणसाच्या घराबाहेर बॉम्ब लावतो हेच मला कळत नाही. म्हणून मी यावर जास्त बोलत नाही असेही राज ठाकरे म्हणाले.
राज्य सरकार निवडणूक पुढे ढकलत आहे
राज्य सरकार काहीतरी कारण काढून निवडणूक पुढं ढकलत आहे. ओबीसीसारखे अनेक घोळ घालून ठेवले आहेत. मूळ विषय बाजूला ठेवून नको ते विषय पुढं येत आहेत. पत्रकारांचाही वापर सुरु आहे. 28 दिवस दाखवले बाहेर पडल्यावर आर्यन खान, सुशांत सिंग यांचे काय झाले. तसेच अंबानींच्या घराबाहेरील बॉम्बचे पुढं काय झालं. मूळ विषय बाजूला ठेवून दुसरंच सुरु असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली.
देशात अस्थिरता
'5 लाख व्यावसायिक देश सोडलं एक बातमी होते याचा काय परिणाम होईल यावर कुणी बोलत नाही. देशात - राज्यात भयानक अस्थिरता आहे. बाबरी पडली त्यावेळी राग होता त्याची मत मिळाली. आता राममंदिर बांधताय त्याचा आनंद आहे. मात्र, याचेही मत मिळतील का हे पाहावे लागेल' असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर 'सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील तिघांचं सरकार सध्या तरी पडेल असे वाटत नाही. मला कुणाचे वैयक्तिक घोटाळे बाहेर काढायचे नाहीत. किरीट सोमय्या करतात त्याचे पुढे काय होतंय असे राज ठाकरे यांनी सांगत राज्यात कोणत्या पक्षासोबत युती करायची ते निवडणूकीच्या वेळी बघू' असेही वक्तव्य त्यांनी केले.
एमआयएम मोर्चा आरक्षण
आरक्षण शिक्षण आणि नोकरीसाठी असते. सगळं खाजगी होत चालले आहे. मग या आरक्षण मागण्या फक्त मतांसाठी आहे. केंद्र आणि राज्य ओबीसी यादी वर बोलताय. केंद्र यादी देत नाही. राज्याला ओबीसी (OBC Reservation) मोजायला 435 कोटी हवेत. पण हे पैसेसुद्धा मिळत नाही. काही तासांच्या भ्रष्टाचारात इतके पैसे निघतात. जातीने बजबजपुरी झालेला इतका महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही. सगळ्यांमध्ये जात आली आहे. इतकं खाली हा महाराष्ट्र गेलाय अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
एसटी संप ताणू नये
एसटीचे विलनीकरण (ST workers agitation) करताना इतर महामंडळ देखील तशी मागणी करतील. कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजे यात दुमत नाही. एक प्रोफेशनल managment कंपनी हवीय. हे सगळं चालवण्यासाठी, मात्र त्यांनीही आता विषय फार ताणू नये, असेही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा - Raj Thackeray Maharashtra Daura : राज ठाकरेंच्या दौऱ्याने मनसेला नवसंजीवनी मिळणार का?