औरंगाबाद - मनसेचा झेंडा आज बदलला नाही. निवडणूक आयोगाला तीन वर्षांपूर्वीच हा झेंडा देखील असेल असे सांगितले होते, आज फक्त तो जाहीर केला. निवडणुकीत मात्र रेल्वे इंजिनच दिसणार. हिंदुत्व म्हणजे विकासाकडे दुर्लक्ष असं होत नाही, असं राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सांगितले.
औरंगाबादेत मृत विहिरी जिवंत केल्या. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. आणि ज्याच्याकडे सत्ता नाही त्याला प्रश्न विचारले जातात. उलटे प्रश्न त्यांना विचारले जातात. नाशिक मध्ये आम्ही जे पाच वर्षात केले. ते काम औरंगाबादेत सत्तेत असलेले इतक्या वर्षात का करू शकले नाहीत. तसे ही विकास पाहून मतदान होत नाही हे नाशिककडे पाहून कळले. नाशिकमध्ये जे केले ते तर मी नाशिककरांना सांगितले देखील नव्हते असे ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले व्हॅलेन्टाईन डे कडे लक्ष देण्यापेक्षा देशात महिलांवर होणारे ऍसिड हल्ले त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाकीच्या फुटकळ गोष्टी आहेत. शहरात अनेक फकल लावण्यात आले ज्यात हिंदू जननायक म्हणले आहे मात्र तसे नाही. माझ्या मोर्चानानंतर मी सक्त ताकीद दिली आहे असे लिहू नका म्हणून. असे राज ठाकरे यांनी पत्रकारांसोबत औपचारिक चर्चा करताना स्पष्ट केले. पुलवामावर काय बोलणार, जवान शहीद झाले दुर्दैवी होते. अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्यासोबत चांगली मैत्री मानली जात आहे. आपल्याकडे कोणाला भेटले की मैत्री झाली अशी चर्चा सुरू होते. राजकारणात अनेकांशी संबंध असतातच. शरद पवारांबरोबर अनेक प्रश्नवर - राजकीय मतभेद असले तरी वयक्तिक संबंध चांगले राहातात, मी पवार यांना ईव्हीएम संदर्भात भेटलो. असे राज ठाकरे म्हणाले.
भीमा कोरेगावचा तपास लागला पाहिजे हे महत्त्वाचे तो तपास कोण करत हे महत्त्वाचे आहे. अशी टोलेबाजी राज ठाकरे यांनी केली. मनसे भूमिका बदलते असे बोलतात. मात्र, माझी भूमिका बदललेली नाही. मी माझ्या भाषणात सांगितले. पाकिस्तानी कलाकारांना हकला असे म्हणालो. हिंदुत्ववादी सांगणाऱ्या संघटनांनी केलं आहे का कधी. झेंड्याचा रंग वगळता काहीही बदल झालेला नाही. लोकांना फक्त तस वाटते. माझ्या मराठीला नख लावाल तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल. माझ्या धर्माला नख लावाल तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन. असे मी म्हणालो होतो. हुंदुत्वाचा मुद्दा आला तर अनेक मुद्दे येतात. चांगल्या गोष्टींसाठी बदल झाला पाहिजेत. भूमिका बदलली नाही, मस्जिदिवरील भोंगे, पाकिस्तानी कलावंतांविरोधात आंदोलन, रजा अकादमी मोर्चा मीच केला ना कुठे भूमिका बदलली. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.