औरंगाबाद : लसीकरण करण्याबाबत आता विद्यापीठ तसेच महाविद्यालयांत काम करणार्या प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना देखील सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिली. लसीचे दोन डोस न घेणाऱ्या प्राध्यापकांना मिळणारे लाभ देखील थांबवण्यात येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सामंत यांनी केले आहे.
लस न घेणाऱ्या प्राध्यापकांना सुविधांचा लाभ नाही, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा इशारा प्राध्यापकांना लसीकरण अनिवार्यप्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य यांना लस घेणे अनिवार्य असणार आहे. दोन डोस झाले असले पाहिजेत अन्यथा त्यांना कुठलाही लाभ देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की दोन डोस घ्या आणि विद्यार्थ्यांनी जर आम्हाला विचारले की आमच्या प्राध्यापकांना एकच घेतला आहे तर त्यांना आम्ही उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे कुलगुरूंना आधी नोटीस काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही जर लसीकरण होत नसेल तर त्यांना मिळणारे लाभ बंद करण्याचा विचार आहे. त्याच बरोबर वेळप्रसंगी त्यांचे वेतन थांबविण्याची कारवाई देखील होऊ शकते असा इशारा सामंत यांनी दिला.
विद्यार्थ्यांना लसीकरण गरजेचेआपल्यापासून रोगराई पसरू नये, एज्युकेशन सिस्टीम मधल्या प्रत्येक घटकाचे लसीकरण करण्यात यावे. कुणालाही बोट दाखविण्याची संधी नसावी म्हणून शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे, असा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी देखील लसीकरण पूर्ण करावं. तसं होत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घरोघरी देखील लसीकरणाची मोहीम आपण राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्यात ऑफलाईन ऑनलाइन आम्ही दोन्ही सब्जेक्ट ठेवलेला आहे. काही दिवसांनी ऑनलाईन बंद करावे लागेल. त्यामुळे परीक्षा असतील किंवा महाविद्यालयात शिक्षण असेल तर, लसीकरण गरजेचं असणार आहे असे उदय सामंत म्हणाले.
हेही वाचा - मुंबईकरांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट BMC आज पूर्ण करणार