औरंगाबाद - मागील वर्षभरापासून शहर दंगलीने गाजले होते. मात्र पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत शहरात शांतता प्रस्थापीत केली आहे. आता शहरातील वातावरण शांततापूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. मागील वर्षभरापासून शहर दंगलीने गाजले होते. आता परिस्थिती वेगळी आहे. शहरातील वातावरण उत्तम आहे. नागरिकांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.