ETV Bharat / city

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन जणांना बेड्या, दोन पिस्तुलासह एक काडतूस जप्त

निवडणुकीच्या काळात काही घातपात घडविण्याचा प्रयत्न होता का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

author img

By

Published : Apr 20, 2019, 7:04 PM IST

औरंगाबाद - अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या दोन जणांना गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, एक काडतूस आणि गावठी कट्टादेखील पोलिसांनी जप्त केला आहे. अशोक संबळे आणि नामदेव भुसारे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथे रात्रीच्यावेळी गस्तीला असलेल्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी भुसारे वस्तीत सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून पिस्तूल, गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त केली आहेत.आरोपींवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात काही घातपात घडविण्याचा प्रयत्न होता का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. तसेच ही शस्त्रे आरोपींनी कोठून आणली, याचा तपासदेखील सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सांगितले.

Intro:अवैधरीत्या शास्त्र बाळगणाऱ्या दोन जणांना गंगापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे असलेले एक गावठी पिस्टल, एक काडतूस एक गावठी कट्टा देखील जप्त केलाय.Body:गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगांव येथे रात्र गस्ती करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी हि कारवाई केली आहे.Conclusion:अशोक संबळे आणि नामदेव भुसारे दोन आरोपी अटक करण्यासाठी. भुसारे वस्तीतील आरोपीच्या घरी पोलिसांनी सापळा लावून अटक केली. आरोपीच्या घरी दरवाजे पिशवीमध्ये पीस्टन, गावठी कट्टा, आणि राऊंड पोलिसांनी जप्त केले.
त्याच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात काही घातपात घडवण्याचा प्रयत्न होता या बाबत पोलीस चौकशी करत असून हि शस्त्र आरोपींनी कोठून आणली याचा तपास देखील गंगापूर पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.