औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊ नये यासाठी औरंगाबाद खंडपीठात रिपब्लिकन युवा मोर्चाच्यावतीने याचिका दाखल (Petition against Raj Thackeray Aurangabad Sabha) करण्यात आली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली असून, याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंड न्यायाल्याने ठोठावला आहे. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे.
हेही वाचा - Bhim Army Warn Raj Thackeray Aurangabad Sabha : औरंगाबादेतील राज ठाकरेंची सभा उधळून लावू; भीम आर्मीचा इशारा
अशी होती याचिका - राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभा बंदीबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली होती. रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका केली होती. शुक्रवारी दुपारी यावर सुनावणी झायी. राज ठाकरे यांच्या सभेमुळे वातावरण बिघडू शकते, सभेला परवानगी दिली आहे. मात्र, सभा live दाखवू नये आणि त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट पोलीस आणि न्यायालयाने तपासूनच पुढे जावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरेंच्या सभेविरोधातील जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने १ लाखांचा दंड लावून फेटाळली. पुढील 3 दिवसात कॉस्ट (दंड रक्कम) भरण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा - राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली (Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally) आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.
हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Sabha : अखेर राज ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी