ETV Bharat / city

शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच रुग्णाचा मृत्यू, औरंगाबादेतील घटना

author img

By

Published : Mar 17, 2021, 5:42 PM IST

या व्यक्तीच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या लागलेल्या होत्या. तसंच त्यावर माशाही घोंगावत होत्या. विशेष म्हणजे रुग्णालय परिसरातील कुणीही या व्यक्तीकडे लक्ष देत नव्हते.

शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच रुग्णाचा मृत्यू, औरंगाबादेतील घटना
शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच रुग्णाचा मृत्यू, औरंगाबादेतील घटना

औरंगाबाद : वेळेवर उपचार न मिळाल्याने शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. या मृताची ओळख पटलेली नसून त्याला रुग्णालयात कुणी आणले याविषयीही काहीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

अपघात विभागासमोर सदर रुग्ण पडून होता

कुणीही दिले नाही लक्ष

याविषयी सविस्तर वृत्त असे की, औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरील पायरीवर पायाला जखम झालेला एक व्यक्ती पडलेला होता. या व्यक्तीच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या लागलेल्या होत्या. तसंच त्यावर माशाही घोंगावत होत्या. विशेष म्हणजे रुग्णालय परिसरातील कुणीही या व्यक्तीकडे लक्ष देत नव्हते. याची माहिती मिळाल्यानंतर या व्यक्तीला उपचारांसाठी अपघात विभागात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. सदर व्यक्तीला कुणीतरी घाटीत सोडून गेल्याची शक्यता घाटी प्रशासनाने व्यक्त केली आहे. या व्यक्तीला ज्यांनीही घाटीत सोडले, त्यांनी अपघात विभागात दाखल करणे गरजेचे होते. या व्यक्तीला के के ग्रुपच्या किशोर वाघमारे आणि सहकाऱ्यांनी अपघात विभागात दाखल केले. यानंतर डाॅक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

वैद्यकीय अधिष्ठातांनी दिली प्रतिक्रिया

...तर वाचले असते प्राण

या व्यक्तीविषयी के के ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे, अक्षय दांडगे यांनी डाॅक्टरांना माहिती दिली होती. एका कोरोना रुग्णाला दाखल करताना अपघात विभागासमोर सदर रुग्ण पडून असल्याचे दिसले. त्याच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या झाल्या होत्या. तोपर्यंत तो जिवंत होता. त्याविषयी अपघात विभागातील डाॅक्टरांना आणि ‘आरएमओ’ यांनाही माहिती दिली. पण दोन तासांनंतरही कुणीही आले नाही. शेवटी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वेळीच त्याच्यावर उपचार केले असते तर प्राण वाचले असते, असं के के ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे यांनी म्हटलं आहे.
व्हिडिओ काढण्याऐवजी मदत करायला हवी
शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी यावर बोलताना, याबाबत डॉक्टरांना माहिती नव्हती. फोटो-व्हिडिओ काढणाऱ्यांनी रुग्णाला वेळेवर रुग्णालयात नेले असते तर तो बचावला असता असं म्हटलं आहे.

हेही वाचा - स्कॉर्पिओ, इनोव्हा, मर्सडीज 'या' ३ कारमध्ये दडलेय वाझे प्रकरणाचे गुढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.