औरंगाबाद : जिल्ह्यात 11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शनिवार आणि रविवार मात्र जिल्ह्यात पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन, लग्न-समारंभांवर बंदी - astik kumar pandey
11 मार्च पासून रात्री बारा ते 4 एप्रिलपर्यंत नवीन नियमावली लागू असणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सर्वसामान्य व्यवहार सुरू असतील. या काळात राजकीय-सामाजिक सभा, धार्मिक स्थळ आणि आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालये बंद असणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन, लग्न-समारंभांवर बंदी
औरंगाबाद : जिल्ह्यात 11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शनिवार आणि रविवार मात्र जिल्ह्यात पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Last Updated : Mar 8, 2021, 7:44 AM IST